आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएअर इंडियाच्या विमानात न्यूयॉर्कहून येणाऱ्या महिलेवर लघवी करणाऱ्या आरोपीच्या कुर्ल्यातील घरी दिल्ली पोलिस शुक्रवारी पोहोचले. येथे पोलिसांना आरोपी आणि त्याचे कुटुंब सापडले नाही. घरी काम करणारी मोलकरीण सापडली.
आरोपी आणि पीडित महिलेचे व्हॉट्सअॅप चॅटही समोर आले आहे. त्यानुसार, आरोपीने महिलेला आधी 5,000 आणि नंतर 10,000 रुपये दिले आणि माफी मागितली. परंतु पीडित महिलेच्या मुलीने 15,000 रुपये परत केले आणि तुम्ही जे केले त्याची भरपाई पैशाने होऊ शकत नाही, असे म्हटल्याचे चॅटमधून समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांना आरोपीच्या घरात काहीही सापडले नाही
आरोपी एस. मिश्रा नावाच्या व्यक्तीच्या शोधात दिल्ली पोलिस मुंबईतील कुर्ला परिसरात पोहोचले. येथे आरोपी व त्याचे कुटुंब सापडले नाही. त्यांच्या घरी काम करणारी मोलकरीण संगीता हिने सांगितले की, या घरात एका महिलेसोबत तीन मुले राहतात. घरातील सदस्यांचे नाव तिला माहीत नाही, पण आडनाव मिश्रा आहे.
संगीता गेल्या वर्षभरापासून या घरी काम करत आहे. बुधवारपर्यंत संपूर्ण कुटुंब या घरी होते. संगीता गुरुवारी रजेवर होत्या. शुक्रवारी आल्या तेव्हा घर बंद असल्याचे दिसले. संगीताने सांगितले की, मिश्रा कुटुंबीयांनी ते कुठे जात आहेत, हेही सांगितले नाही. याआधी प्रत्येक वेळी निघण्यापूर्वी कुटुंबीय माहिती देऊन जायचे.
आरोपी एस मिश्राने एअर इंडियाच्या विमानात ज्या महिलेवर लघवी केली होती, त्यांच्यात घटनेच्या दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअॅप चॅट सुरू झाले होते. 27 नोव्हेंबरच्या चॅटमध्ये पीडित महिला आरोपीकडून 5 हजार रुपये मिळाल्याचे चॅटमधून समोर आले. तर आपली मुलगी व जावई या घटनेमुळे खूप नाराज झालेत. पण मी आरोपीला आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटत असल्याचे सांगत त्यांना तक्रार दाखल करण्यापासून रोखले.
त्यानंतर आरोपी पीडित महिलेचे आभार मानतो. तसेच महिलेला लवकरात लवकर पैसे पाठवण्याचेही आश्वासन देतो. तो महिलेला माफी मागत भविष्यात अशी चूक करणार नसल्याची ग्वाही देतो.
त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी आरोपी पीडित महिलेला सांगतो की, त्यांचे कपडे स्वच्छ करण्यासाठी पाठवण्यात आलेत. ते त्यांना दुसऱ्या दिवशी परत मिळतील. त्यानंतर त्याने महिलेला 10 हजार रुपये ट्रान्सफर करत असल्याचेही सांगितले. पीडित महिला पैसे मिळाल्याची पुष्टी करते. तसेच आरोपीला बंगळुरूला पोहोचल्याचेही सांगते.
त्यानंतर आरोपी पीडितेला सांगतो की, तो त्यांच्याशी संबंधित सर्वच वस्तू रविवारपर्यंत त्यांना पाठवून देईल. त्यानंतर दोघांत 4 डिसेंबर रोजी पुन्हा चॅट होते. त्यात आरोपीकडून महिलेच्या घरी एक कुरिअर पाठवले जाते.
दुसऱ्याच दिवशी 5 डिसेंबर रोजी महिलेच्या मोबाइलवरुन आरोपीच्या फोनवर आणखी एक मेसेज येतो. तो महिलेच्या मुलीने पाठवलेला असतो. या मेसेजमध्ये पीडित महिलेला या घटनाक्रमामुळे धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे. कुटुंब अत्यंत नाराज आहे. झाल्या प्रकाराची भरपाई पैशाने होणार नाही, असे नमूद करत पीडितेची मुलगी आरोपीने दिलेले 15 हजार रुपये परत करते.
26 नोव्हेंबर रोजी घडली होती घटना
एअर इंडियाच्या विमानातील एका व्यक्तीने बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध महिलेवर लघवी केली होती. ही घटना गत 26 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर वृद्ध महिलेने टाटा समुहाच्या चेअरमनकडे तक्रार केल्यानंतर विमान कंपनीचे अधिकारी सक्रीय झाले. त्यांनी दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल केला.
पीडितेने टाटा समूहांच्या अध्यक्षांकडे तक्रार केली
एअर इंडियाच्या विमानातून बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर एका नशेत अंदाधुंद असलेल्या व्यक्तीने लघुशंका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गतवर्षी 26 नोव्हेंबरची आहे. या घटनेवर विमान कंपनीने कोणतीही कारवाई केलीली नव्हती. त्यानंतर त्या वृद्ध महिलेने टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केली, त्यानंतर विमान कंपनीचे अधिकारी सक्रीय झाले. त्यांनी दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल केला आणि तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीला विमान प्रवास करण्यास बंदी घातली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.