आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Air India, Domestic Airlines Minimum And Maximum Air Fare, Vande Bharat Mission, 20 Thousand Indians Brought Back In 17 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशांतर्गत उड्डाणांसाठी नवे नियम:विमान भाडे 2000 ते 18000 रुपये निश्चित, मधील आसनावरही प्रवासी, आरोग्य सेतूच्या ग्रीन सिग्नलवरच प्रवेश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंतरानुसार भाडे सात श्रेणीत, 40% तिकिटे किमान-कमाल भाड्याच्या सरासरीने विकावी लागणार
  • युजर डेव्हलपमेंट चार्ज, प्रवासी सेवा शुल्क व जीएसटी वेगळे राहील

कोरोना संकटात विमान कंपन्यांनी मनमानी भाडे वसूल करू नये यासाठी सरकारने किमान आणि कमाल भाडे निश्चित केले आहे. ही व्यवस्था तीन महिने राहील. ४०% तिकिटे किमान-कमाल भाड्याच्या सरासरीहून कमीने विकावे लागतील. गृह मंत्रालयाने प्रवासी, विमानतळ आणि विमान कंपन्यांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. आरोग्य सेतू अॅपमध्ये हिरवा सिग्नल पाहूनच प्रवाशांना विमानतळात प्रवेश मिळेल. अॅप नसेल तर नऊ मुद्द्यांचे सेल्फ डिक्लेरेशन भरावे लागेल. काही कंपन्यांनी गुरुवारी रात्री बुकिंग सुरू केले.

आजपासून सेवा केंद्रावर मिळणार तिकीट

देशभरात सुमारे १.७ लाख कॉमन सेवा केंद्रांवर शुक्रवारपासून रेल्वे तिकिटांचे बुकिंग सुरू होईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले, येत्या दोन-तीन दिवसांत काही रेल्वेस्टेशनवरही बुकिंग सुरू होईल. लवकरच आणखी रेल्वेगाड्या सुरू होतील. १ जूनपासून धावणाऱ्या १०० रेल्वेसाठी गुरुवारी बुकिंग सुरू झाले. सुरुवातीच्या अडीच तासांतच ४ लाख लोकांनी तिकिटे बुक केली होती. गोयल म्हणाले की, २०५० विशेष श्रमिक रेल्वेतून ३० लाखांहून जास्त प्रवासी घरी पोहोचले आहेत.

दिशानिर्देश : विमानात जेवण मिळणार नाही, टॉयलेटचा वापर टाळण्याचा सल्ला

> प्रवाशांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप अनिवार्य. हिरवा संकेत असेल तरच प्रवेश मिळेल. अॅप नसल्यास नऊ मुद्द्यांचे सेल्फ डिक्लेरेशन भरावे लागेल. १४ वर्षांहून लहान मुलांना अॅप अनिवार्य नाही.

> सेल्फ डिक्लेरेशनमध्ये प्रवासी कंटेनमेंट झोनमध्ये राहिलेला नाही, ताप-खोकला, श्वसनास त्रास नाही ही माहिती द्यावी लागेल.

> वेब चेक इन अनिवार्य. स्वत:च बोर्डिंग पास प्रिंट करावा लागेल.फक्त एकच चेक्ड इन बॅग आणि एक हँड बॅगला परवानगी.

> उड्डाणाच्या दोन तास आधी विमानतळावर यावे लागेल. ज्यांचे विमान चार तासांनी आहे अशांनाच विमानतळ परिसरात प्रवेश मिळेल.

> चेक्ड इन बॅगचे टॅग स्वत: प्रिंट करून लावावे लागेल. चेक इनवेळी प्रवाशांचे बोर्डिंग पास तपासणी करणारे कर्मचारी आणि प्रवाशांत काच लावलेली असेल.

> विमानात मधील आसने रिकामी नसतील. मास्क अनिवार्य. सेफ्टी किट मिळेल. यात मास्क, सॅनिटायझर राहील. ई-बोर्डिंग पास स्वत:च स्कॅन करावे लागतील.

> विमानात क्रू सदस्यांशी कमी बोलणे,मोकळ्या जागेत न येण्याचा, टॉयलेटचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमानात जेवण मिळणार नाही.

> विमानतळावर जागोजागी सॅनिटायझर राहील. केबिन क्रू पीपीई किटमध्ये असतील.

श्रेणीनुसार असे ठरेल प्रवास भाडे

ए : ४० मिनिटांचे उड्डाण : २००० ते ६००० रु. ४६ मार्ग - अहमदाबाद-इंदूर, अमृतसर-श्रीनगर, भोपाळ-मुंबई, चंदिगड-दिल्ली, जयपूर-दिल्ली, पाटणा-रांची आदी.

बी : ४० ते ६० मिनिटे : २५०० ते ७५०० रु. ८३ मार्ग - अहमदाबाद-भोपाळ, अहमदाबाद-जयपूर, अहमदाबाद-मुंबई, अमृतसर-दिल्ली, भोपाळ-दिल्ली आदी.

सी : ६० ते ९० मिनिटे : ३००० - ९००० रु. ८७ मार्ग : अहमदाबाद-चंदिगड, अहमदाबाद-दिल्ली, इंदूर-दिल्ली, रायपूर-दिल्ली, जयपूर-मुंबई आदी.

डी : ९० ते १२० मिनिटे : ३५०० ते १० हजार रु. ७० मार्ग - मुंबई-दिल्ली, अहमदाबाद-कोलकाता, बंगळुरू-भोपाळ आदी.

ई: १२० ते १५० मिनिटे : ४५०० ते १३,००० रु. ६० मार्ग : बंगळुरू- दिल्ली, चंदिगड-हैदराबाद, चेन्नई-दिल्ली, चेन्नई-जयपूर, गुवाहाटी-दिल्ली, श्रीनगर-मुंबई आदी.

एफ : १५० ते १८० मिनिटे : ५५०० ते १५,७०० रु. ३२ मार्ग - अहमदाबाद-गुवाहाटी, बंगळुरू-चंदिगड, कालिकत-दिल्ली, दिल्ली-इंफाळ आदी.

जी : १८० ते २१० मिनिटे : ६५०० ते १८,६०० रु. ६ मार्ग - कोइम्बतूर- दिल्ली, दिल्ली-तिरुवनंतपुरम, दिल्ली-पोर्ट ब्लेअर आदी.

नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले की, उन्हाळ्यातील वेळापत्रकानुसार मंजूर उड्डाणे होतील. मागणीनुसार उड्डाणे वाढवण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...