आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • American Passenger Smokes Cigarette In Air India Flight; London To Mumbai | Air India

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये अमेरिकन प्रवाशाने ओढली सिगारेट:विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, क्रू मेंबर्सनी हातपाय बांधून बसवले

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 मार्च रोजी लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानात सिगारेट ओढल्याची घटना घडली होती. - फाइल फोटो

एअर इंडियाच्या विमानात एक प्रवासी सिगारेट ओढताना पकडला गेला. घटना 11 मार्चची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एक अमेरिकन प्रवासी टॉयलेटमध्ये सिगारेट ओढत होता.

क्रू मेंबर्सनी त्याला रोखल्यावर तो त्यांच्यावर आरडाओरड करू लागला. तसेच विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. यानंतर क्रू मेंबर्सनी त्याचे हात-पाय बांधून त्याला बसवले.

इंडो-अमेरिकन आहे आरोपी, अटकेची शक्यता

विमान मुंबईत उतरल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी 37 वर्षीय रमाकांतविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका अधिकाऱ्याने सांगितले- प्रवासी मूळचा भारतीय आहे, पण त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. नियमानुसार विमानात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकते. सध्या रमाकांतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फायर अलार्म वाजल्याने क्रू मेंबर्स पोहोचले

क्रू मेंबर म्हणाले- फ्लाइटमध्ये धूम्रपान करण्यास परवानगी नाही. असे असतानाही एक प्रवासी शौचालयात गेला आणि तेथे धूम्रपान करू लागला. फायर अलार्मचा आवाज ऐकताच आम्ही लगेच शौचालयाजवळ पोहोचलो. रमाकांतच्या हातात सिगारेट दिसली. त्यानंतर तो आमच्यावर ओरडायला लागला. आम्ही त्याला परत सीटवर जाऊन बसायला सांगितले. तो ऐकत नव्हात, त्याने फ्लाइटमध्ये उपस्थित प्रवाशांशी वादही घातला.

क्रू मेंबर पुढे म्हणाले- रमाकांतने फ्लाइटचा दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याचे हात-पाय बांधून त्याला सीटवर बसवले. यानंतर त्याने डोक्याला हात मारायला सुरुवात केली. फ्लाइटमधील प्रवासी हा व्यवसायाने डॉक्टर होता, आम्ही त्याची मदत घेतली. त्याने रमाकांत यांना तपासले. यानंतर रमाकांतने काही औषधे सोबत असल्याचे सांगितले. त्याची बॅग तपासली असता आम्हाला औषधे नसून ई-सिगारेट सापडली.

नशा होती की नाही, हे वैद्यकीय तपासणीत कळणार

प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले- सध्या प्रवाशाचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यावरून त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज येईल. यासोबतच त्याने कोणत्या प्रकारची नशा केली होती की नाही याचीही माहिती मिळू शकते.

इंडिगो फ्लाइटमध्ये तरुणीचे धूम्रपान

एखादा प्रवासी धूम्रपान करताना पकडला गेल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 5 मार्च रोजी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये 24 वर्षीय तरुणीला पकडण्यात आले होते. कोलकाता-बंगळुरू फ्लाइटमध्ये एक मुलगी टॉयलेटमध्ये सिगारेट ओढत होती. त्याचप्रमाणे 4 मार्च रोजी एअर इंडियाच्या कोलकाता-दिल्ली फ्लाइटमध्ये अनिल मीना नावाच्या व्यक्तीला धूम्रपान करताना पकडले होते.

प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या घटनांत वाढ

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या घटना वाढत आहेत. यापूर्वी सहप्रवाशांवर लघुशंका केल्याची घटना समोर आली होती. प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याच्याही बातम्या आल्या आहेत. अशा स्थितीत विमानतळ अधिकाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

वास्तविक, विमानतळावर प्रवेश केल्यानंतर प्रथम प्रवाशांचे सामान स्कॅन केले जाते. त्यानंतर सिक्युरिटी होल्ड एरियामध्ये शरीराची झडती घेतली जाते. हातातील सामानाचीही तपासणी केली जाते. असे असूनही विमानात प्रवाशांसोबत सिगारेट आणि दारू आढळल्याने प्रश्न निर्माण झाले.

बातम्या आणखी आहेत...