आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Air India Flight Controversy; New York Delhi | Mumbai Accused Shekhar Mishra Will Be Arrested

विमानात वृद्धेवर लघवी करणाऱ्याला होणार अटक:दिल्ली पोलिसांची पथके तैनात, एअर इंडिया क्रू मेंबर्सवर करणार कारवाई

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली पोलिसांनी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या विमानात वृद्ध महिलेवर लघवी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्याची तयारी केली आहे. आरोपीचे नाव शेखर मिश्रा आहे. 45 वर्षीय मिश्रा मुंबईचा आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम 354, 294, 509, 510 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांच्या टीम्स गठीत केल्या आहेत. एअर इंडियानेही या प्रकरणी कारवाई केली आहे. आरोपीवर 30 दिवसांसाठी बंदी घातली आहे.

प्रथम पाहुया काय आहे वाद

एअर इंडियाच्या विमानातील एका व्यक्तीने बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेवर लघवी केली होती. ही घटना गत 26 नोव्हेंबर रोजी घडली. त्यावर विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही. वृद्ध महिलेने या प्रकरणी टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर कंपनीचे अधिकारी सक्रिय झाले व दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल केला.

महिलेने टाटा समूहाला पत्र लिहिल्यानंतर घटना उजेडात

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडित महिलेने टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. महिलेने पत्रात लिहिले की, तिची अस्वच्छ सीटवर बसण्याची इच्छा नाही. त्यामुळे तिला दुसरी जागा देण्यात आली. तासाभरानंतर त्यांना त्यांच्या जागेवर जाण्यास सांगण्यात आले. त्यांची सीट चादरीने झाकलेली होती. त्यावर लघवीचा दुर्गंधी येत होता.

या महिलेचा आरोप आहे की, बिझनेस क्लासच्या अनेक जागा रिक्त असतानाही तिला दुसरी केबिन सीट देण्यात आली नाही. क्रूने तिथे जंतुनाशक फवारले. त्यानंतर महिलेने ती सीट घेण्यास विरोध दर्शवला. शेवटी तिला दुसरी सीट देण्यात आली.

महिला आयोगही सक्रिय, 7 दिवसांत मागवला अहवाल

वृद्ध महिलेशी झालेल्या या गैरवर्तनाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे व वृद्धेला मानसिक त्रास देणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.

क्रू मेम्बरविरोधात तक्रार, तपास समिती स्थापन

वृद्ध महिलेने टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीत विमानातील क्रू मेंबर्सवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. त्यानंतर कंपनीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. चौकशी करताना पीडित प्रवाशी व त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची बाजू समजून घेतली जाईल, असे कंपनीने या प्रकरणी म्हटले आहे. एअर इंडियाने कंपनीने पीडित महिलेच्या तिकिटाचे पैसे परत केल्याचीही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...