आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Air India Flight Controversy; Passenger Assaulted Crew Members | Delhi London Flight | Air India

गैरवर्तन:एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची क्रू सदस्याला मारहाण, 2 जखमी; लंडनला जाणारे विमान दिल्ली विमानतळावर परतले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअर इंडियाच्या AI-111 विमानात सोमवारी ही घटना घडली. आरोपी प्रवाशी सध्या पोलिस कोठडीत आहे. - Divya Marathi
एअर इंडियाच्या AI-111 विमानात सोमवारी ही घटना घडली. आरोपी प्रवाशी सध्या पोलिस कोठडीत आहे.

प्रवाशाच्या गैरवर्तनामुळे लंडनच्या दिशेने जाणारे एअर इंडियाचे एक विमान अर्ध्यातूनच दिल्ली विमानतळावर परतले. विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या AI-111 विमानात एका प्रवाशाचा क्रू सदस्याशी वाद झाला. त्याने त्यांना मारहाण केली. त्यात 2 क्रू सदस्य जखमी झाले.

अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडियाच्या विमानाने सोमवारी सकाळी 6.30 वा. लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाने गैरवर्तन सुरू केले होते. विमानातील स्टाफने त्याला वारंवार समजावून सांगितले. पण त्याने आपले गैरवर्तन तसेच सुरू ठेवले. त्याच्या मारहाणीत 2 केबिन क्रू सदस्य जखमीही झाले. त्यामुळे लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या दिशेने जाणारे हे विमान परत दिल्लीला बोलावण्यात आले. ते सकाळी 10.30 वा. दिल्लीत परतले. आरोपी प्रवाशाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रवाशी पोलिसांच्या ताब्यात आहे.

पेशावरजवळ उडत होते विमान

फ्लाइटला रिअल टाइम ट्रॅक करणाऱ्या Flightradar24 अॅपनुसार, एअर इंडियाचे विमान ज्यावेळी दिल्लीला परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी ते पाकिस्तानच्या पेशावरच्या आकाशात उडत होते.

एअर इंडियाचे CEO म्हणाले - दररोज तक्रारी मिळतात

एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन फेब्रुवारीतील एका मुलाखतीत म्हणाले होते की, एअरलाइन क्रूला नेहमीच ड्यूटीवर असताना प्रवाशांच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. तक्रार येत नाही, असा एकही दिवस जात नाही. विमानातील प्रवाशांच्या वर्तनात घसरण झाली आहे. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी एअरलाइन कायद्यात बदल करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

जानेवारीत स्पाइसजेटच्या विमानात प्रवाशाने केले होते गैरवर्तन

गत जानेवारी महिन्यात स्पाइसजेटच्या विमानात प्रवाशाने एका एअरहोस्टेस अर्थात हवाई सुंदरीची छेड काढली होती. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यात आरोपी एअरहोस्टेसवर ओरडताना दिसून येत होता. या घटनेनंतर अबसार व त्याच्या सहकारी प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आले होते. आरोपी प्रवाशी अबसार आलम दिल्लीच्या जामिया नगरचा होता. तो आपल्या कुटुंबासोबत हैदराबादला जात होता. तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली.

एअर इंडियाच्या विमानात घडले होते लघवीकांड

गतवर्षी 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानात शंकर मिश्रा नामक प्रवाशोाने एका वयोवृद्ध महिलेवर लघवी केली होती. या घटनेनंतर विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही. अखेर पीडित वृद्ध महिलेने या प्रकरणी थेट टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर कंपनीने दिल्ली पोलिसांत संबंधित प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी DGCA ने एअरलाइनवर तब्बल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला. DGCA ने वैमानिकाचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला. तसेच आरोपी शंकर मिश्रावरही विमान प्रवासाची 4 महिन्यांची बंदी घातली.

लघुशंका प्रकरण : मला धक्का बसला होता; परंतु कर्मचाऱ्यांचा तडजोडीसाठी दबाव, वृद्धेने मांडली कर्मचाऱ्यांची वागणूक

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करताना ७० वर्षीय महिलेसमोर गैरवर्तन करणाऱ्या घटनेचा एफआयआर समोर आला आहे. एअर इंडियाकडील तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. त्यात या महिलेने दिलेली हकीगत अशी- सविस्तर वाचा...