आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pilot's License Suspended For Taking Girlfriend Into Cockpit; DGCA Slaps A Fine Of Rs 30 Lakh On Air India

कारवाई:मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेल्याप्रकरणी पायलटचा परवाना निलंबित; DGCA ने एअर इंडियाला ठोठावला 30 लाखांचा दंड

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअर इंडियाच्या पायलटवर आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये आणून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा आरोप करण्यात आला आहे. - Divya Marathi
एअर इंडियाच्या पायलटवर आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये आणून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला 27 फेब्रुवारी रोजी दुबई-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाच्या सुरक्षेत चूक केल्याबद्दल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या फ्लाइटचा पायलट त्याच्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये घेऊन गेला होता. दोघेही तिथे तासभर थांबले. आरोपी पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. सहवैमानिकाने त्यांना येथे थांबू नका असा इशारा दिला होता. यासोबतच एअर इंडियाला त्या फ्लाइटच्या क्रूवरही कारवाई करण्यास सांगितले आहे.

दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये पायलटने त्याच्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेले. दोघेही तिथे तासभर थांबले. पायलटने क्रूला तिच्यासाठी उशा मागवून तिला अल्कोहोल सर्व्ह करण्यास देखील सांगितले. जेव्हा क्रूने कॉकपिटमध्ये अल्कोहोल देण्यास नकार दिला तेव्हा वैमानिक संतप्त झाला आणि त्यांनी त्यांना शिवीगाळ केली.

क्रूने पायलटवर शिवीगाळ आणि अश्लील कमेंट केल्याचा आरोपही केला आहे. (फाइल फोटो)
क्रूने पायलटवर शिवीगाळ आणि अश्लील कमेंट केल्याचा आरोपही केला आहे. (फाइल फोटो)

हे प्रकरण DGCA च्या सुरक्षा नियमांच्या विरोधात असल्याचे सांगत क्रूने 27 फेब्रुवारी रोजी तक्रार केली होती. यावर 3 मार्च रोजी डीजीसीएने एक समिती स्थापन करून तपास सुरू केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर एअरलाइन्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या प्रकरणी काहीही बोलण्यास मनाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, DGCA ने फ्लाइट क्रूला बोलावून त्यांची चौकशी केली.

विमानांशी संबंधित आणखी बातम्या वाचा...

एअर इंडियाच्या विमानात महिलेला चावला चक्क विंचू, नागपूरहून मुंबईला जात होते विमान; गत महिन्यातील घटना आज उघड

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-630 विमानात एका महिला प्रवाशाला विंचवाने चावा घेतला. एअर इंडियाने शनिवारी सांगितले की, ही घटना 23 एप्रिल म्हणजेच गत महिन्यात घडली होती. विमान एअरपोर्टवर उतरल्यानंतर डॉक्टरांनी प्रथम त्या महिलेवर उपचार केले. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. आता ती बरी आहे. पूर्ण बातमी वाचा...

विमानात विंडो सीटवरून महिला भिडल्या:झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल

​​​​​​​

अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये महिला विमानात हाणामारी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ ब्राझिलच्या जीओएल एअरलाईन्सच्या विमानातला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये महिला एकमेकांच्या झिंज्या उपटत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित विमान सलवादोरवरून साओ पाओलोकडे जात होते. यावेळी एका महिलेने आपल्या अंपग मुलासाठी एका दुसऱ्या महिलेला सीट बदली करुन घेण्यासाठी विनंती केली. पण त्या महिलेने नकार दिल्यानंतर दोघींमध्ये भांडण सुरू झाले. येथे वाचा संपूर्ण बातमी...

गैरवर्तन:एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची क्रू सदस्याला मारहाण, 2 जखमी; लंडनला जाणारे विमान दिल्ली विमानतळावर परतले

प्रवाशाच्या गैरवर्तनामुळे लंडनच्या दिशेने जाणारे एअर इंडियाचे एक विमान अर्ध्यातूनच दिल्ली विमानतळावर परतले. विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या AI-111 विमानात एका प्रवाशाचा क्रू सदस्याशी वाद झाला. त्याने त्यांना मारहाण केली. त्यात 2 क्रू सदस्य जखमी झाले.

अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडियाच्या विमानाने सोमवारी सकाळी 6.30 वा. लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाने गैरवर्तन सुरू केले होते. विमानातील स्टाफने त्याला वारंवार समजावून सांगितले. पण त्याने आपले गैरवर्तन तसेच सुरू ठेवले. त्याच्या मारहाणीत 2 केबिन क्रू सदस्य जखमीही झाले. त्यामुळे लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या दिशेने जाणारे हे विमान परत दिल्लीला बोलावण्यात आले. ते सकाळी 10.30 वा. दिल्लीत परतले. आरोपी प्रवाशाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रवाशी पोलिसांच्या ताब्यात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

विमान हवेत, प्रवाशी जमिनीवर:स्पाइस जेटच्या विमानाचे 14 प्रवाशांना विमानतळावर सोडून उड्डाण, अमृतसरहून दुबईला जात होती फ्लाइट

​​​​​​​

स्पाइस जेटचे विमान पंजाबच्या अमृतसर विमानतळावर 14 प्रवाशांना सोडून तसेच दुबईला रवाना झाल्याची घटना घडली आहे. स्पाइस जेटच्या ग्राउंट स्टाफने व्हिसावर नाव जुळत नसल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे. पण काही प्रवाशांनी अशाच व्हिसाद्वारे दुबईला उड्डाण केल्याचे स्पष्ट केल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...