आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळच्या कोझिकोड विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. दुबईवरुन आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले आहे. विमानात 180 प्रवासी होते.
एअर इंडियाचे विमान आयएक्स-1344 दुबईवरुन केरळला येत होते. या विमानात 174 प्रवाशांसह 6 क्रू मेंबर्स होते. या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भयंकर होता की, विमानाचे दोन तुकडे झाले. अपघातात जवळपास 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे. पावसामुळे विमान स्लिप झाल्याचे सांगितले जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.