आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडिया टाटाकडे:89 वर्षांपूर्वी 2 लाखांत स्थापली कंपनी, आता 18 हजार कोटींत खरेदी, टाटा म्हणजे वेलकम!

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एअर इंडियात १२,०८५ कर्मचारी आहेत. ८,०८४ स्थायी आणि ४,००१ कंत्राटी आहेत

टाटा समूहाने सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या अधिग्रहणाची बोली जिंकली आहे. शुक्रवारी केंद्राच्या ‘दीपम’चे सचिव तुहिनकांत पांडेय म्हणाले, ‘टाटा समूहाने १८,००० कोटींची बोली लावून एअर इंडियाची १००% हिस्सेदारी मिळवली. यासाठी स्पाइसजेटच्या अजय सिंह यांनीही १५,००० कोटींची बोली लावली होती.’ २००३-०४ नंतर सरकारी संपत्तीचे हे पहिलेच खासगीकरण आहे. एअर इंडियामुळे इंडिगोनंतर (५६% वाटा) टाटा विमान समूह देशाची दुसरी मोठी (१३.४%) राष्ट्रीय कंपनी असेल.

भास्कर एक्सप्लेनर

सरकारी अधिकाऱ्यांचा मोफत प्रवास बंद होणार, कर्मचारी एक वर्ष कायम राहणार
टाटाला एअर इंडिया कशी मिळाली?
करारासाठी राखीव किंमत १२,९०६ कोटी रुपये होती. १८,००० कोटींपैकी २,७०० कोटी रुपये टाटा समूह रोखीने देईल. १५,३०० कोटी रुपये कर्जाद्वारे देईल. करारात फक्त कोअर अॅसेट आहे. सुमारे १५ हजार कोटी रु. ची नॉन-कोअर अॅसेट (इमारती इत्यादी) एअर इंडिया अॅसेट होल्डिंग लि. मध्ये ठेवली जाईल. तेच विकून कर्ज चुकते केले जाईल. सरकार ३१,५४४ कोटी रुपये देईल.

विद्यमान कर्मचाऱ्यांचे काय होईल?
एअर इंडियात १२,०८५ कर्मचारी आहेत. ८,०८४ स्थायी आणि ४,००१ कंत्राटी आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये १,४३४ कर्मचारी आहेत. ५ वर्षांत ५००० स्थायी कर्मचारी निवृत्त होतील. पहिल्या वर्षी समूह कुठलीही कर्मचारी कपात करणार नाही. नंतर कपातीची गरज भासल्यास व्हीआरएस आणावी लागेल. कर्मचाऱ्यांची १,३३२ कोटी रु. ची थकबाकी सरकार देईल. सरकारी अधिकाऱ्यांचा मोफत विमान प्रवास बंद होईल. तथापि, त्यांना एअर इंडियातूनच प्रवास करावा लागेल.

मालकी कधीपर्यंत मिळेल?
सरकारने शेअर ट्रान्सफरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२१ पर्यंतचा अवधी निश्चित केला आहे. यादरम्यान आवश्यक मंजुऱ्या घेतल्या जातील. उदा. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची मंजुरी.

करारातून टाटाला काय मिळेल?
एअर इंडियाकडे ११७ लहान-मोठी आणि एअर इंडिया एक्स्प्रेसकडे २४ विमाने आहेत. १८०० आंतरराष्ट्रीय आणि ४,४०० देशांतर्गत लँडिंग व पार्किंग स्लॉट आहेत. त्यात ९०० विदेशात आहेत. त्यात हिथ्रो आणि दुबईसारखे प्रमुख विमानतळ आहेत.

पहिले आव्हान... नवे नेतृत्व अन् कुशल व्यवस्थापन देणे
एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे जाणे ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे सतत कर्जात बुडणाऱ्या एका एअरलाइन्सला जीवदान मिळाले आहे. यामुळे देशांतर्गत व देशाबाहेरील प्रवासाचा कायापालट होईल.

टाटामुळे आता एअर इंडियाची प्रतिमा बदलेल, भारताची प्रतिमा उजळेल. यात टाटांसमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते नवे नेतृत्व आणि कुशल व्यवस्थापन बहाल करण्याचे. यासाठी लागणारी जिद्द, पैसा आणि व्यवस्थापन सारेच टाटांकडे आहे. इतके दिवस एअर इंडिया कुणाशीच स्पर्धा करू शकत नव्हती. आता खासगी कंपन्यांनाही बदल सुधारणा कराव्या लागतील. जगात अनेक असे भाग आहेत, जेथे फक्त एअर इंडियाचीच विमाने जातात. अमेरिकेपासून जपानपर्यंत ही कंपनी सेवा देत आहे. भारतात सर्वच विमानतळांवर टाटांच्या एअर इंडियाकडे पार्किंग स्पेस आहे. प्रशिक्षित वैमानिकांची मोठी फळी आहे. आता या ताफ्यात नवी विमाने सामील होतील. विमानाच्या आसनांपासून केबिन क्रूपासून सर्व काही आता अगदी व्यावसायिक एअरलाइन्ससारखे होईल. यामुळे हवाईमार्गे प्रवास करणाऱ्यांनाही ते सुखकारक ठरेल. केवळ आपल्याच प्रवाशांसाठी नव्हे, तर इतर एअरलाइन्सच्या प्रवाशांनाही या सुधारलेल्या सुविधांचा लाभ होऊ शकणार आहे.आज जेआरडी टाटा

आपल्यात असते तर खूप आनंदी झाले असते. आम्ही सरकारचेही आभार मानतो.

बातम्या आणखी आहेत...