आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:औरंगाबाद, नाशिकसह देशभरातील 27 मालमत्ता एअर इंडिया विकणार; बुकिंग ऑफिस, कर्मचारी निवासस्थाने विक्रीला

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • 300 कोटी कमाईचा अंदाज; मुंबई, नागपूरसह सर्वाधिक मालमत्ता महाराष्ट्रात

कर्जबाजारी झालेली सरकारी मालकीची विमान कंपनी एअर इंडियाने देशभरातील १० शहरांतील २७ मालमत्ता विकायला काढल्या आहेत. यात राज्यातील औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि मुंबईतील कंपनीची बुकिंग कार्यालये आणि कर्मचारी निवासाचा समावेश आहे. कंपनीला यातून २७० ते ३०० कोटी रुपयांच्या कमाईची अपेक्षा असून पुढील महिन्यात ई-बीडद्वारे विक्री प्रकिया होईल.

सततच्या तोट्यामुळे सरकारने एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तोटा भरून काढण्यासाठी कंपनीच्या मालकीच्या मालमत्तांची विक्री करण्यासाठी वर्षभरात दुसऱ्यांदा जाहिरात काढण्यात आली आहे. १८ जून रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित जाहिरातीनुसार ८ जुलै रोजी ऑनलाइन बोली लावण्यास (ई-बिडिंग) सुरुवात होऊन ती ९ जुलै रोजी संपेल. ई-बिडिंगमध्ये विशेष हातखंडा असलेली सरकारी मालकीची कंपनी एमएसटीसी लिमिटेड या मालमत्तांच्या विक्रीसाठी नियुक्त करण्यात आली आहे.

मालमत्ता आणि किंमती
एमएसटीसी लिमीटेडच्या एका वरिष्ठ अधिकऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यातील मालमत्तांचा तपशील असा आहे-
औरंगाबाद-बुकिंग कार्यालय-प्लॉट-२७२९ चौ.मी., बांधकाम क्षेत्र- ६३९ चौ.मी., बोलीस सुरूवातीची रक्कम (स्टार्टींग प्राईस) - २१.५४ कोटी, अहर्तापूर्ण ठेव रक्कम (ईएमडी)- ४२.८९ लाख

  • औरंगाबाद-स्टाफ क्वार्टर-प्लॉट-७०६ चौ.मी., बांधकाम क्षेत्र- ३७५ चौ.मी., बोलीस सुरूवात- ४.६४ कोटी, ईएमडी- १३.९१ लाख
  • मुंबई- २ बीएचके फ्लॅट-बांधकाम क्षेत्र - १३०.१० चौ.मी., बोलीस सुरूवात - २.९५ कोटी, ईएमडी - ८.८२ लाख
  • मुंबई- २ बीएचके फ्लॅट-बांधकाम क्षेत्र - ११४.१० चौ.मी., बोलीस सुरूवात - २.५९ कोटी, ईएमडी - ७.७४ लाख
  • मुंबई- ३ बीएचके फ्लॅट-बांधकाम क्षेत्र - १३७.५० चौ.मी., बोलीस सुरूवात - ३.११ कोटी, ईएमडी - ९.३० लाख
  • नाशिक सर्व ६ फ्लॅटचे समान विवरण २ बीएचके -बांधकाम क्षेत्र - ५८६.४२ चौ.फूट.,बोलीस सुरूवात - १३.३० लाख, ईएमडी- ५० हजार
  • नागपूर- बुकिंग ऑफीस- जागेचे क्षेत्रफळ-२५०९ चौ.मी, बांधकाम क्षेत्र - ५८८ चौ.मी.,बोलीस सुरूवात - ३६.७८ कोटी, ईएमडी - ७३.५४ लाख

१२ मालमत्ता राज्यातल्या
कंपनीने १० शहरांतील २७ मालमत्ता विक्रीस काढल्या आहेत. यात औरंगाबादच्या २, मुंबई-३, नाशिक-६, नागपूर-१, भुज-२, बंगळुरू-१, कोलकाता-४, मंगळुरू-२, नवी दिल्ली-५ आणि तिरुवनंतपुरमच्या एका मालमत्तेचा समावेश आहे. सर्वाधिक १२ मालमत्ता महाराष्ट्रातील आहेत.

किंमती घटवून विक्री
मालमत्ताच्या किमती १३.३० लाख ते १५० कोटी रुपये दरम्यान आहेत. यातील काही मालमत्ता यापूर्वीही विकायला काढण्यात आल्या हाेत्या. परंतु किमान मूल्य अधिक ठेवल्याने त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. आता त्यात १० टक्के कपात करून पुन्हा एकदा मालमत्ता विक्रीचा चंग बांधण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...