आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पणजी:दिल्लीच्या हवेत प्रदूषण;  डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर साेनिया गांधी शुक्रवारी गाेव्याला रवाना

पणजी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाेन आॅगस्टला रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर साेनिया गांधी सातत्याने डाॅक्टरांच्या निगराणीखाली आहेत.

दिल्लीच्या हवेत प्रदूषण वाढल्याने डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी शुक्रवारी गाेव्यात दाखल झाल्या. दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब असल्याने छातीत संसर्ग वाढला हाेता. समस्या आणखी वाढण्याची भीती हाेती. त्यामुळे काही दिवस गाेवा किंवा चेन्नईसारख्या ठिकाणी जाण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला.

डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार राहुल गांधींसह साेनिया पणजीला पाेहाेचल्या. दाेन आॅगस्टला रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर साेनिया गांधी सातत्याने डाॅक्टरांच्या निगराणीखाली आहेत. सप्टेंबरमध्ये नियमित तपासासाठी परदेशात गेल्या हाेत्या. दरम्यान, सणाेत्सवानंतर दिल्लीत हवेतील प्रदूषणाची पातळी भयावह झाली आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीत एएक्यूआय ३०५ हाेता. ही पातळी अतिशय खराब मानली जाते.