आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलग दुसऱ्या दिवशी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट अनुभवायला मिळाली. राजधानी काही ठिकाणी तापमान १.८ अंशांपर्यंत घसरले होते. धुके, कमी दृश्यमानता व खराब हवामानाचा फटका रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीला बसला.
दिल्लीत ३० विमाने तर २६ रेल्वेगाड्या उशिराने धावल्या. दिल्ली-नाशिक-दिल्ली विमान तब्बल दीड तास उशिराने नाशिक विमानतळावर पाेहाेचले. नियाेजित वेळेपेक्षा दीड तास उशीराने दिल्ली विमानतळावर लँड झाले.
औरंगाबाद : मुंबई विमान रद्द, दिल्लीसाठी पाच तास उशीर
औरंगाबाद | सकाळी ८.५० वाजेचे एअर इंडियाचे औरंगाबाद-मुंबई विमान शुक्रवारी रद्द झाले. खराब हवामानामुळे चिकलठाणा विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारल्याने घिरट्या घालून मुंबईला विमान परत गेले. दिल्लीसाठीचे सकाळी ७.४० वाजता निघणारे विमान दिल्लीहून निघाल्यानंतर अहमदाबादकडे वळवले. ५ तासांनी दुपारी १२ वाजता दिल्लीला जाणारे विमान विमानतळावर उतरले.
मनमाड : उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे उशिराने
मनमाड | उत्तरेकडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे २ ते ६ तास विलंबाने धावल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. पाटलीपुत्र-कुर्ला २ तास, अयोध्या-कुर्ला २.४५ तास, लखनऊ- मुंबई पुष्पक एक्स्प्रेस २ तास, सचखंड एक्स्प्रेस ४ तास, जम्मू तावी-पुणे झेलम ३ तास, हावडा -पुणे एक्स्प्रेस ११.३० तास, निजामुद्दीन- वास्को गोवा ४ तास, दिल्ली -बंगळुरू कर्नाटक एक्स्प्रेस ४ तास तासांच्या विलंबाने धावत होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.