आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Air Travel Is Expensive, Now The Minimum Fare For A 40 minute Flight Is Rs 2,900, While The Maximum Is Rs 8,800

हवाई प्रवास महागला:आता 40 मिनिटांच्या आतील विमान प्रवासाचे किमान भाडे 2,900 रुपये, तर कमाल 8,800

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाड्याची मर्यादा 9.82% वरून 12.82% पर्यंत वाढली

देशांतर्गत विमान प्रवासासाठी आता जास्त पैसे माेजावे लागतील. नागरी उड्डयन मंत्रालयाने विमान प्रवास भाड्याची मर्यादा ९.८२% वरून १२.८२% पर्यंत वाढवली. भाड्यातील वाढ कमाल व किमान पातळीवर झाली. सरकारी अादेशानुसार, ४० मिनिटांच्या आतील उड्डाणाचे किमान भाडे २,६०० वरून ११.५३% वाढवून २,९०० रु. केले. या अवधीच्या उड्डाणाचे कमाल भाडे आता आधीच्या १२.८२% जास्त म्हणजे ८,८०० रुपये असेल.

  • सरकारचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमुळे विमान कंपन्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. २५ मे २०२० ला उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यानंतर भाड्याची नवी मर्यादा ठरवली होती. आता त्यात भाढेवाढ करण्यात आली आहे. कारण की विमान प्रवास आता पूर्वपदावर आला आहे.
  • प्रवासी सुरक्षा फी, युजर डेव्हलपमेंट फी व जीएसटी भाड्यापेक्षा वेगळे आकारले जाईल.
बातम्या आणखी आहेत...