आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे निर्देश:विमानांना 85% प्रवासी क्षमतेची परवानगी, भाड्याची मर्यादा 15 दिवसांसाठीच

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरी उड्डयन मंत्रालयाने देशांतर्गत विमान कंपन्यांना ८५% प्रवासी क्षमतेने सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आढाव्यानंतर प्रवाशी क्षमता ७२.५% वरून ८५% करण्याचा निर्णय घेण्यात आला. आदेशात मंत्रालयाने म्हटले की, भाड्याची कमाल व किमान मर्यादाही केवळ १५ दिवसांपुरतीच लागू असेल. कंपन्याना इतर १५ दिवसांसाठी या मर्यादेपासून मुभा असेल. मात्र कंपन्यांनी या महिन्यापर्यंत भाडेवाढ करण्याची गरज नाही.

याआधी मंत्रालयाने देशातील विमान कंपन्यांना उड्डाण क्षमता ६५% वरून ७२.५% करण्याची परवानगी दिली होती. मंत्रालयाने शनिवारी नवा आदेश जारी केला. त्यात १२ ऑगस्टच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना कोरोना प्रॉटोकॉलचे पूर्णपणे पालन करावे लागेल. मास्क, सॅनिटायझरसोबत फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...