आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाममधील जोरहाटहून कोलकात्याला जाणारे इंडिगोचे विमान धावपट्टीवरून घसरले. विमान धावपट्टीवरून उतरून थेट मैदानात गेले आणि विमानाची चाके चिखलात फसली. विमानातील सर्व 98 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
ही घटना गुरुवारी दुपारी 2.20 वाजता घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या महिनीनुसार,फ्लाइट 6E757 धावपट्टीवरून घसरले. त्यामुळे आधी विमान डीले झाले आणि नंतर रात्री 8.15 वाजता उड्डाण रद्द करण्यात आले.
इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशांना दुसऱ्या विमानाने कोलकाता येथे पाठवण्यात आले आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) च्या अधिकाऱ्यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कबुली दिली ज्यामुळे हा अपघात झाला. AAI आणि इंडिगो या घटनेची चौकशी करतील.
स्पाइसजेटच्या विमानाचेही कॉशन लँडिंग
गुरुवारीच मुंबईहून गुजरातमधील कांडलाला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे मुंबईत कॉशन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. गेल्या 40 दिवसांत स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणानंतरच्या तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा लँडिंग होण्याची ही 9वी घटना होती. त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे DGCAच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एक दिवस आधी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्पाइसजेटच्या 50% विमानांवर दोन महिन्यांसाठी बंदी घातली होती. यादरम्यान DGCA स्पाईसजेटच्या उड्डाणांवर विशेष लक्ष ठेवणार आहे. स्पाईसजेटने सांगितले होते की, DGCAच्या आदेशामुळे विमान व्यवस्थापनावर परिणाम होणार नाही, कारण ऑफ सीझनमुळे विमानांची संख्या आधीच कमी झाली आहे.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्र्यांचे राज्यसभेत उत्तर
अलीकडेच, सरकारने राज्यसभेत देखील उत्तर दिले की, DGCA ने स्पाइसजेटच्या विमानांचे स्पॉट चेकिंग केले आहे. नागरी उड्डाण राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, DGCAने 9 जुलै ते 13 जुलै दरम्यान स्पाईसजेटच्या 48 विमानांची 53 स्पॉट तपासणी केली आणि त्यात कोणतेही मोठे सुरक्षेचे उल्लंघन आढळले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.