आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Airline Fares Will Increase By Four Times After The Lock Down; Booking Allowed After April 14th

विमानसेवा:लाॅकडाऊननंतर अनेक मार्गांचे विमान भाडे चार पटीने वाढणार; 14 एप्रिलनंतरची बुकिंग करण्यास परवानगी 

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. अग्रवाल म्हणाले, असहायतेचा फायदा घेऊ नये

शरद पांडेय

लाॅकडाऊनला १४ एप्रिलला २१ दिवस पूर्ण होतील. त्यानंतर लॉकडाऊन हटवला जाईल की नाही अाणि विमानसेवा सुरू होईल की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. तरीही खासगी विमान कंपन्यांचे बुकिंग सुरू आहे. त्यांना डीजीसीएने लाॅकडाऊन संपल्यानंतर बुकिंगची सवलत दिली आहे. फ्लेक्सी फेअर व जास्त मागणीमुळे भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सर्वाधिक चारपट वाढ दिल्ली व मुंबईहून पाटण्याच्या भाड्यात झाली आहे. इतर मार्गांवरही भाडे तीनपट झाले आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, सध्याचा लाॅकडाऊन अजून एक आठवडा आहे. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आणि प्रवास करावा लागणाऱ्यांची संख्या वाढेल. यामुळे भाडे आणखी वाढेल.  

असहायतेचा फायदा घेऊ नये

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. अग्रवाल म्हणाले, लॉकडाऊननंतर लोक इच्छा नसतानाही प्रवास करतील. यामुळे विमान कंपन्यांनी लोकांकडून जास्त भाडे वसूल करू नये याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.

बातम्या आणखी आहेत...