आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलचे बिल वाढणार:एअरटेल, जिओचे मोबाइल दर महागण्याची शक्यता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भविष्यात तुमच्या मोबाइलचे बिल वाढणार आहे. आर्थिक सेवा कंपनी जेफरीजच्या ताज्या अहवालानुसार, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओचे दर आगामी तीन आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत १० टक्क्यांनी वाढू शकतात. अहवालानुसार, या वर्षी सप्टेंबर तिमाहीत एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि जिओने एका ग्राहकामागे (एआरपीयू) सरासरी महसुलात नफा मिळवला आहे. हे दूरसंचार कंपनीची कामगिरी मोजण्याचे प्रमाण आहे. जिओच्या एआरपीयूमध्ये ०.८ टक्क्यांची वाढ झाली. तर, व्होडाफोन आयडियाने १ टक्का व एअरटेलने ४ टक्क्यांची वाढ नोंदवली.

बातम्या आणखी आहेत...