आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Seeks More Compensation From Tej Pratap Yadav, Latest News And Update

जज साहेब...23 हजारांत भागत नाही:ऐश्वर्या रायने तेज प्रताप यादवांकडे मागितली अधिकची नुकसान भरपाई

पाटणा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव व त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी ऐश्वर्याने पाटणा हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावत पोटगीत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यावर कोर्टाने तेज प्रताप यांना नोटीसही बजावली आहे. न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. पुढील सुनावणी 23 जूनला होईल.

न्यायालयाने ऐश्वर्याला दरमहा 23 हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. आता तिने ही पोटगी वाढवण्याची मागणी केली आहे. तेजप्रतापचे वकील जगन्नाथ सिंह यांनी दिव्य मराठीला सांगितले की, 'मी तेजप्रताप यांच्यावतीने कोर्टात हजर राहून नोटीस स्विकारली. या प्रकरणी 23 जून रोजी कोर्टात स्पष्टीकरण सादर केले जाईल.'

सिंह म्हणाले -'कौटूंबिक हिंसाचाराविषयी ऐश्वर्या राय विरोधात दाखल आदेश व पोटगीशी संबंधित प्रकरणातील पैसे वाढवून मिळण्याबाबत पाटणा हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांना दरमहा 23 हजार रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण, आता त्या ही रकम वाढवण्यासाठी कोर्टात गेल्या आहेत.'

तेजप्रताप व ऐश्वर्याचे झाले होते थाटामाटात लग्न

चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या हिचे मे 2018 मध्ये थाटामाटात लग्न झाले होते. त्यात अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावून वधू-वराला आशीर्वाद दिले होते. पण, लग्नानंतर अचानक काही महिन्यांनी तेजप्रतापने पाटणा कुटूंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या वृत्ताने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय गोटात एकच खळबळ माजली. यामुळे लालू व राबडी देवींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

लग्नानंतर काही दिवसांपर्यंत सर्वकाही चांगले होते. तेजप्रतापने ऐश्वर्याला सायकलवरही फिरवले होते.
लग्नानंतर काही दिवसांपर्यंत सर्वकाही चांगले होते. तेजप्रतापने ऐश्वर्याला सायकलवरही फिरवले होते.

या काळात दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांचा भर रस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. त्यानंतर ऐश्वर्याने माध्यमांपुढे अश्रू ढाळत लालूंच्या कुटूंबांवर विविध आरोप केले होते.

राबडी निवासस्थानातून रडत बाहेर पडली होती ऐश्वर्या राय.
राबडी निवासस्थानातून रडत बाहेर पडली होती ऐश्वर्या राय.

सासू-नणंदेवरही केले होते आरोप

ऐश्वर्याने म्हटले होते की, सासू राबडी देवींनी हुंड्यासाठी खूप अत्याचार केले. नणंदा टोमणे मारतात. ऐश्वर्याने राबडी देवी, मीसा भारती व तेजप्रताप यांच्याविरोधात कौटूंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राजद नेत्याने राबडींचा बचाव करुन ऐश्वर्यावरच सासूला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. सध्या त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायप्रविष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...