आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ajab Prem Ki Ghazab Kahani: Bangladesh Girl Swims To India From To Marry Boyfriend | Marathi News

बांगलादेशातून पोहत भारतात आली प्रेयसी:22 वर्षीय तरुणी तासभर नदीत पोहली, प्रियकरासोबत लग्न केले; आता अटक

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमात माणूस काय करेल याचा काही नेम आहे. बांगलादेशातून भारतात आलेल्या 22 वर्षीय कृष्णा मंडलची कहाणी ऐकून तुम्ही हेच म्हणाल. भारतात तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी हिंस्र प्राण्यांनी भरलेला सुंदरबन डेल्टा पार करून ती पश्चिम बंगालमध्ये आली. लग्नही झालं, पण पोलिसांनी अटक केली. आता पोलिसांनी तिला बांगलादेशात परत पाठवण्याची तयारी केली आहे.

कृष्णा मंडलची भारतात राहणाऱ्या आशिक मंडलसोबत काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र कृष्णाकडे पासपोर्ट नसल्याने तिला भारतात प्रवेश मिळत नव्हता. वैतागून तिने सुंदरबन डेल्टा पोहून भारतात येण्याचा निर्णय घेतला.

कृष्णाने तिचा प्रियकर आशिक मंडलशी गेल्या आठवड्यात कोलकाता येथील कालिकत मंदिरात लग्न केले.
कृष्णाने तिचा प्रियकर आशिक मंडलशी गेल्या आठवड्यात कोलकाता येथील कालिकत मंदिरात लग्न केले.

पत्नीला अटक, पती त्रस्त
सुमारे तासभर नदीत पोहत कृष्णा भारताच्या सीमेवर पोहोचली. गेल्या आठवड्यात कोलकाता येथील मंदिरात तिचे लग्न झाले. पोलिसांना याची खबर मिळताच कृष्णाला अटक करण्यात आली. तिच्याकडे भारतात येण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तिला बांगलादेश सीमेवर अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल. आता कृष्णाचा पती आशिक मंडल खूप अस्वस्थ झाला असून कायदेशीर मदत घेण्याचा विचार करत आहे.

सुंदरबनचा परिसर हिंस्र वन्य प्राण्यांनी वेढलेला आहे.
सुंदरबनचा परिसर हिंस्र वन्य प्राण्यांनी वेढलेला आहे.

अशी घुसखोरी यापूर्वीही झाली आहे
सुंदरबनमध्ये अशा प्रकारे पोहून भारतात घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही असाच एक तरुण चॉकलेट खरेदीसाठी भारतात दाखल झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला 15 दिवसांची कोठडी सुनावली होती.

बातम्या आणखी आहेत...