आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या आणखी एका मित्राच्या घरावर तसेच कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. ACE ग्रुपचे CMD अजय चौधरी यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ACE ग्रुप दिल्ली, नोएडा आणि आगरा यासह 40 ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकला आहे.
अखिलेश यादव यांचे जवळचे मित्र आहेत अजय चौधरी
ACE बिल्डर्सचे मालक अजय चौधरी हे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे जवळचे मित्र आहेत. दिल्ली आणि NCR तील दिग्गज बिल्डर्स अजय चौधरीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर्स अजय चौधरींच्या कार्यालयावर मोठी छापेमारी करण्यात आली आहे. यापुर्वी देखील उत्तर प्रदेशमध्ये आयकर विभागाने कारवाई केली होती. कन्नौज येथील अखिलेश यादव यांचे जवळचे मित्र आणि एमएलसी पुष्पराज जैन पंपी यांच्यावर देखील आयकर विभागाने छापा टाकला होता.
निवडणुकांपूर्वी कारवाईचा बडगा
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आयकर विभागाच्या छाप्यावरुन आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, अनेक जण आम्हाला सांगत होते की, निवडणुकांपूर्वी समाजवादी पार्टीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर आयकर विभागाची छापेमारी करण्यात येणार आहे. त्यावरुन अखिलेश यांनी भाजपवर टीकास्त्र केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवरच आली असता, समाजवादी पार्टीवर होणाऱ्या कारवाईमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.