आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बी अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी आपल्या आरोग्याची माहिती शेअर करत केली. मी बरा आहे. हळूहळू रिकव्हरी होत आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता सेटवर परतेन, असे ते म्हणाले. अमिताभ सोमवारी 'प्रोजेक्ट K' चित्रपटाच्या शूटिंगवेळी एक धाडसी सीन करताना जखमी झाले होते.
दुसरीकडे, चित्रपट अभिनेता अजय देवगन यांनी बिग बी यांची प्रशंसा केली आहे. चित्रपट भोलाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात ते म्हणाले की, 1998 साली आलेल्या मेजर साब चित्रपटातील एका दृश्यात अमिताभ बच्चन यांनी तब्बल 30 फुटांवरून उडी मारली होती.
अजय म्हणाला - ‘अमिताभ सरांनी मला मी 30 फुटांवरून उडी मारणार असल्याचे सांगितले होते. हे अंतर जवळपास 3 मजली इमारतीएवढे होते. मी त्यांना हा सीन न करण्याचा सल्ला दिला. ते रात्रीचे दृश्य होते. मी त्यांना डुप्लीकेटची मदत घेण्याचे सांगितले. पण त्यांनी आपणच हा सीन करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यात आम्ही जखमीही झालो होतो. पण सीन करण्याचा उत्साह जरूर होता.’
वय वाढत आहे, तशा गोष्टीही सोप्या होत आहेत
अजय म्हणाला, ‘आज सेटवर सर्वच प्रकारची सुरक्षा व सावधगिरी बाळगली जाते. सेटवर रुग्णवाहिका व डॉक्टरही असतात. जखमा टाळण्यासाठी पॅडिंग व खूप साऱ्या गोष्टी असतात. पूर्वीच्या तुलनेत आता अॅक्शन सीन करणे फार सोपे झाले आहे. आमचे वय वाढत असताना गोष्टीही सोप्या होत जात आहेत. याबद्दल ईश्वराचे आभार.
अॅक्शन सीन करणे कार चालवण्यासारखे आहे. तुमच्यासोबत केव्हाही दुर्घटना होऊ शकते. तुम्ही सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करता. पण त्यातही जोखीम असते. बच्चन सर आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच अॅक्शन सीन करतकात. तेव्हा कोणतेही केबल नव्हते. त्यामुळे सीन केल्यानंतर अनेकजण जखमी होत होते. तुम्ही कल्पनाही करणार नाही, असे सीन्स त्यांनी केलेत.’
बिग बी म्हणाले - तुमच्या प्रार्थना हाच माझा उपचार
बिग बी मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हणाले, ‘तुम्हा सर्वांना खूप प्रेम व आभार. तुमची काळजी व शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. तुमच्या प्रार्थना माझ्यासाठी उपचाराचे काम करतात. माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यासाठी काही वेळ लागेल. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे मी तंतोतंत पालन करत आहे. सर्वच कामे बंद पडली आहेत. प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांच्या परवानगीनंतरच मी आता कामावर परतेल. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.’
बिग बींनी चाहत्यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा
अमिताभ पुढे म्हणाले - काल रात्री जलसावर होलिकेचे दहन करण्यात आले. होळीच्या तारखेविषयी खूप संभ्रमावस्था आहे. होळी आज व काल दोन्ही दिवस साजरी करण्यात आली. या संभ्रमामुळे जे करता आले असते ते करता आले नाही. पण या आनंदोत्सवात माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. होळीचे रंग तुमच्या आयुष्यात अनेक रंग घेऊन येवोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.