आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Ajay Mishra Teni Son | Lakhimpur Violence Accused Ajay Mishra Teni Son Ashish Mishra Court Video

मिशांवर ताव देत कोर्टात पोहोचला मंत्रीपुत्र:लखीमपूर हिंसाचाराचा आरोपी आशिष मिश्रावरील आरोप निश्चिती लांबणीवर

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू यांच्यावर आज आरोप निश्चित केले जाणार होते. मात्र सुनावणी 24 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. डिस्चार्ज अर्ज दाखल करताना आशिषच्या वकिलाने युक्तिवाद केला होता. आशिष मिश्रा हे राज्याचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या स्वागतासाठी जात होते. तेव्हा हा अपघात झाला. याला सुनियोजित षडयंत्र म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद आशिष यांच्या वकिलांनी केला होता. तरयावर शेतकरी पक्षाचे वकील मोहम्मद अमान यांनी आक्षेप नोंदवला. यानंतर कोर्टाने सुनावणीसाठी 24 मे ही पुढील तारीख निश्चित केली आहे.

याआधी मोनू पोलिस बंदोबस्तात कोर्टात दाखल झाले. तेव्हा ते आपल्या मिशी ताव मारताना दिसून आले. लखीमपूर खेरीतील टिकुनिया हिंसाचारात आशिषसह 14 आरोपींपैकी 13 आरोपी जिल्हा कारागृहात बंद आहेत. त्यापैकी फक्त एकाला जामीन मिळाला आहे. 3 जानेवारी रोजी न्यायालयात 5000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

3 ऑक्टोबर 2021 रोजी लखीमपूर खेरी येथील टिकुनियामध्ये वाहनाने चिरडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हिंसाचार भडकला होता.
3 ऑक्टोबर 2021 रोजी लखीमपूर खेरी येथील टिकुनियामध्ये वाहनाने चिरडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हिंसाचार भडकला होता.

आशिष 24 एप्रिलपासून तुरुंगात -
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 10 फेब्रुवारी रोजी आशिषला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर शेतकरी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची बाजू ऐकून न घेताच उच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. 18 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना जामीन रद्द केला होता. टिकुनिया हिंसाचाराचा मुख्य आरोपी आशिष मिश्रा 24 एप्रिल 2022 पासून तुरुंगात आहे.

आशिष मिश्रा उर्फ मोनू (उजवीकडे) हे प्रमुख आरोपी म्हणून आहेत. तर त्याचे वडील मंत्री अजय कुमार मिश्रा (डावीकडे) त्याचा बचाव करत आले आहेत.
आशिष मिश्रा उर्फ मोनू (उजवीकडे) हे प्रमुख आरोपी म्हणून आहेत. तर त्याचे वडील मंत्री अजय कुमार मिश्रा (डावीकडे) त्याचा बचाव करत आले आहेत.

आरोपांपासून वेगळे होण्याचा अर्ज म्हणजे डिस्चार्ज अर्ज
आशिष मिश्रा यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगत डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता. त्याच्यावरील कारवाईला कोणताही आधार नाही, असे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयीन नोंदींमध्ये असा कोणताही पुरावा नाही ज्याच्या आधारे त्याच्यावर खटला चालवता येईल. त्यावर फिर्यादीने आक्षेप नोंदवावा.

हायकोर्टातून जामीन
या हायप्रोफाईल प्रकरणात हायकोर्टाने जामीनाचा निर्णय कसा दिला, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. वकिलांच्या युक्तिवादानंतर हायकोर्टाने म्हटले होते की, सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य केला तरी घटनास्थळी हजारो आंदोलक होते हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत चालकाने पळून जाण्यासाठी कार पळवली आणि ही घटना घडली. युक्तिवादादरम्यान असे सांगण्यात आले की, वाहन शेतकऱ्यांवर चढवण्यासाठी प्रवृत्त केले गेल्याचा एकही पुरावा एसआयटी सादर करू शकली नाही.

टिकुनिया हिंसाचाराचे दोन खटले चालू, आशिष एका प्रकरणात आरोपी
टिकुनिया हिंसाचारात दाखल झालेल्या पहिल्या प्रकरणात एसआयटीने 3 जानेवारी रोजी सीजेएम न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 10 जानेवारीला हे प्रकरण सत्र न्यायालयात गेले. यानंतर एसआयटीने खेरी प्रकरणातील दुसऱ्या प्रकरणात 21 जानेवारीला सीजेएम कोर्टात आरोपपत्र दाखल केले. एक फेब्रुवारीला हे प्रकरण सत्र न्यायालयातही गेले. अशाप्रकारे दोन्ही प्रकरणे जिल्हा न्यायाधीश मुकेश मिश्रा यांच्या न्यायालयात आली.

3 मार्च, 16 मार्च, 30 मार्च आणि 12 एप्रिल रोजी दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी झाली. 12 एप्रिल रोजी न्यायाधीशांनी दोन्ही प्रकरणांची स्वतंत्रपणे सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. या दोघांपैकी एक आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी असून, त्याची सुनावणी आज होणार होती.

10 फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता

 • 10 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांच्या जामीन आदेशावर त्यांच्या बाजूने निकाल दिला.
 • जामीन आदेशात चूक झाल्याने 11 फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुधारणा अर्ज दाखल करण्यात आला होता.
 • 14 फेब्रुवारी रोजी जामिनाचा आदेश आला.
 • आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू यांची 15 फेब्रुवारीला सुटका झाली.

दोन महिन्यांनी परिस्थिती बदलली

 • टिकुनिया हिंसाचाराचा साक्षीदार असलेल्या दिलजोत सिंगवर 10 मार्च रोजी हल्ला झाला होता.
 • 10 मार्च रोजी दिलजोत सिंगने टिकुनिया पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
 • एप्रिल महिन्यात रामपूरमध्ये हरदीप सिंगवर हल्ला झाला होता.
 • वकिलाने साक्षीदारांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला.
 • सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला होता आणि सर्व साक्षीदारांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिले होते.

आशिष मिश्रा १२९ दिवस तुरुंगात
अलाहाबाद उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारी रोजी आशिष मिश्राला जामीन मंजूर केला होता. 15 फेब्रुवारीला 129 दिवसांनंतर आशिषची तुरुंगातून सुटका झाली. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरीतील टिकुनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ झाला होता. आंदोलकांना चिरडत तीन वाहने निघून गेली होती. या घटनेत चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. कारने चिरडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

लखीमपूरमध्ये काय घडलं?
3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लखीमपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किमी अंतरावरील नेपाळ सीमेला लागून असलेल्या टिकुनिया गावात मोठ्या संख्येने शेतकरी निदर्शने करत होती. तेव्हा अचानक तीन वाहनांनी (थार जीप, फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ) शेतकऱ्यांना चिरडले. या घटनेने संतप्त शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला.

या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. त्यात चार शेतकरी, एक स्थानिक पत्रकार, दोन भाजप कार्यकर्त्यांचा समावेश होता. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य टिकुनिया येथे पोहचण्यापूर्वी ही घटना घडली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला होता.

बातम्या आणखी आहेत...