आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे नेते अजय राय यांना NCW ची नोटीस:स्मृती इराणींवर केली होती 'टिप्पणी', म्हणाले होते - त्या अमेठीत 'लटके झटके' दाखवण्यासाठी येतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते अजय राय यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत अजय राय यांच्या बेताल वक्तव्यावरून राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते अजय राय यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात केलेल्या अशोभनीय वक्तव्याची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने याप्रकरणी सुनावणी निश्चित केली असून अजय राय यांना २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.

रॉबर्टसगंजमध्ये एफआयआर

अजय रायविरुद्ध सोनभद्र जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय राय यांनी स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सोनभद्र जिल्ह्यातील भाजप नेत्याने गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनभद्र जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा सिंह यांनी अजय रायविरोधात रॉबर्टसगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अजय रायविरुद्ध कलम 354 ए, 501 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सोनभद्रमध्ये दिलेले वादग्रस्त विधान

अजय राय यांनी सोनभद्रमध्ये स्मृती इराणींबाबत वक्तव्य केले होते. त्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे. अजय राय आणि काँग्रेस पक्षाविरोधात भाजपने मोर्चा उघडला. अजय राय सोनभद्रमध्ये म्हणाले होते की, स्मृती इराणी अमेठीत येतात आणि लटके-झटके देऊन निघून जातात. काँग्रेस नेते अजय राय यांच्या या वक्तव्यावरुन वाद वाढला आहे.

अजय राय विधानावर ठाम आहेत

अजय रायच्या वक्तव्यावरून वाद वाढला, माफी मागण्याची मागणीही जोर धरू लागली. अजय राय यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. अजय राय यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी कोणतीही असंसदीय भाषा वापरली नाही आणि अजिबात माफी मागणार नाही. अमेठीत रस्ते खराब झाले आहेत. जर तुम्ही तुमच्या मतदारसंघात फक्त येऊन चक्कर मारून जाणार असाल तर त्याला लटेके-झटेकच म्हटले जाईल.

राहुल गांधी पंतप्रधान होतील
पुढे अजय राय म्हणाले की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो यात्रेला प्रत्येक स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावरून राहुल गांधीच देशाचे पुढचे पंतप्रधान होणार हे स्पष्ट झाले आहे.

'पंतप्रधान मोदींचा पराभव करू'
अजय राय म्हणाले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आव्हान देतो की, मी यावेळी वाराणसीतून लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करेन. जेव्हा मोदी पंतप्रधान नव्हते. तेव्हा मला त्यांच्या विरोधात 76,000 मते मिळाली होती. पंतप्रधान असताना त्यांनी निवडणूक लढवली. तेव्हा मला एक लाख 54 हजार मते मिळाली होती. यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...