आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ajit Jogi Death: First Chief Minister Of Chhattisgarh Dies Of Heart Attack News And Updates On Ajit Jogi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन, 20 दिवसांत तीनदा आला होता हृदयविकाराचा झटका

रायपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित जोगी यांच्या मुलाने फोटो ट्विट करून दिली वडिलांच्या निधनाची माहिती

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे वयाच्या 75 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. गेल्या 20 दिवसांत त्यांना हृदयविकाराचे तीन झटके आले होते. त्यामुळे, प्रकृती अतिशय नाजूक असल्याने ते रुग्णालयातच होते. छत्तीसगडे पहिले मुख्यमंत्री राहिलेले अजित जोगी 2003 ते 2003 पर्यंत या पदावर होते. त्यांचा मुलगा अमित जोगी यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती जारी केली.

कोमामध्ये होते अजित जोगी

अजित जोगी 9 मे पासून कोमातच होते. गळ्यात एक बी अडकल्याने त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका बसला होता. यानंतर त्यांना आणखी 27 मे रोजी एक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर 28 मे पासून ते उपचाराला प्रतिसादही देत होते. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा आणखी एक धक्का बसला. यानंतर त्यांना रायपूरच्या श्रीनारायण रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असल्याचे मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले होते. यानंतर त्यांना कुटुंबियांच्या सहमतीने एक विशेष इंजेक्शन देण्यात आले. अतिशय दुर्मिळ असलेले हे इंजेक्शन छत्तीसगडमध्ये जास्त वापरले जात नाही. तरीही त्यांचा जीव वाचू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...