आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Akali Dal Left NDA 9 Days After Harsimrat's Resignation, The Party Split From NDA

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारला मोठा धक्का:कृषी विधेयकांविरोधात शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर, यापूर्वीच हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मध्ये फूट पडली आहे. शिरोमणी अकाली दल एनडीएतून वेगळे झाले आहेत. 9 दिवसांपूर्वीच हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अकाली दलने लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकांचा विरोध केला होता. भाजप आणि अकाली दल मागील 22 वर्षांपासून सोबत आहेत.

पक्षांतर्गत विरोधाचा सामना करणाऱ्या अकाली दलसाठी मोदी सरकारचे कृषी विधेयक गळ्यात अडकलेला काटा बनले होते. या विधेयकांसाठी पक्षाने भाजपचा पाठिंबा दिला असता, तर राज्यातील मोठी वोट बँक असलेला शेतकरी वर्ग नाराज झाला असता. पंजाबच्या कृषी प्रधान मालवा क्षेत्रात अकाली दलची चांगलीच पकड आहे. अकाली दलने 2022 च्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

या 3 विधेयकांचा विरोध

  • फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स (प्रमोशन अँड फेसिलिटेशन) बिल
  • फार्मर्स (एम्पावरमेंट अँड प्रोटेक्शन) एग्रीमेंट ऑफ प्राइस एश्योरेंस अँड फार्म सर्विसेज बिल
  • एसेंशियल कमोडिटीज (अमेंडमेंट) बिल

1998 पासून अकाली दल एनडीएमधये होता

1998 मध्ये जेव्हा लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींनी एनडीएची स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जॉर्ज फर्नांडीजची समता पार्टी, जयललिताची अन्नाद्रमुक, प्रकाश सिंह बादल यांची अकाली दल आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला. समता पार्टी नंतर नाव बदलून जदयू झाली. जदयू आणि अन्नाद्रमुक एनडीएतून बाहेर होऊन परत वापस आले. शिवसेना आता काँग्रेससोबत आहे. फक्त अकाली दल हा एकमेव पक्ष एनडीएसोबत 22 वर्षांपासून होता.

बातम्या आणखी आहेत...