आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akhilesh Press Conference LIVE : UP Assembly News, Live Updates, Up News, News In Marathi | Up Election Result

EVM ची हेराफेरी:निवडणुकीच्या निकालापूर्वी अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप, म्हणाले- ज्या भागात भाजपचा पराभव, त्या ठिकाणी EVM ची हेराफेरी सुरू

लखनऊ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीचे निकाल येत्या 10 मार्चला समोर येणार आहे. त्यापूर्वी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी EVM मशीनांची हेराफेरी सुरू असल्याचा आरोप केला आहे. ज्या भागात भाजपची हार होताना दिसत आहे. त्या जिल्ह्यातील डीएमला मुख्यमंत्री आणि प्रमुख सचिव फोन करत आहे, आणि मतमोजणी धिम्या गतीने करा असे सांगत आहे. असा आरोप खुलासा अखिलेश यादव यांनी केला आहे.

अखिलेश म्हणाले की, बनारसमध्ये EVM ने भरलेला एक ट्रक पकडण्यात आला असून, दुसरा एक ट्रक फरार झाला आहे. तर बरेली येथे कचऱ्याच्या गाडीत तीन बॉक्स भरुन बॅलेट पेपर्स मिळाले आहे. सोनभद्र येथे देखील EVM मध्ये हेराफेरी झाली असून, सरकारी मतदानाची चोरी करत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.

विना परवानगी होत आहे EVM ची हेराफेरी

बनारसमध्ये विना परवानगी EVM ची हेराफेरी होत असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. भाजपचे नाव न घेता ते म्हणाले की, सपा सरकारच्या काळात बनवलेले बंगले आणि उद्यानांची स्वच्छता होत असल्याचे पाहून हे लोक घाबरले. त्याचवेळी एक्झिट पोलवर अखिलेश म्हणाले की, मला याबाबत काहीही बोलायचे नाही. एक्झिट पोल हे काल आले आहेत. जनतेची दिशाभूल करुन मतचोरी केली जात असल्याचा आरोप अखिलेश यांनी भाजपवर केला आहे.

ही परिवर्तनाची लढाई

उत्तर प्रदेशची लढाई ही लोकशाहीची शेवटची लढाई असल्याचे अखिलेश म्हणाले. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे. कारण, यानंतर पुन्हा परिवर्तनासाठी क्रांती करावी लागणार आहे. स्वातंत्र्यासाठी जशी लढाई लढावी लागते, तशीच लढाई पुन्हा लढावी लागेल. अखिलेश यादव यांनी जनतेला आवाहन केले आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने मतदान केले, त्यापद्धतीने आपले मत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर आहे. असे म्हणत अलिखेश यादव यांनी मतमोजणीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे.

सचिवाने मतमोजणी संथ गतीने करण्यास सांगितले

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सचिव जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन, ज्या ठिकाणी भाजपचा पराभव होत आहे. त्याठिकाणी मतमोजणी संथ गतीने करा. जेणेकरुन EVM मध्ये हेराफेरी केली जाऊ शकेल. असे सांगत आहे. जिल्हाधिकारी हे सरकारसाठी काम करत आहे. असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

.. यामुळे मतमोजणी भागात जॅमरची मागणी
अखिलेश म्हणाले की, बॅलेट पेपर पकडण्यात आले आहे. सोनभद्र आणि बरेली येथे सर्रासपणे EVM ची हेराफेरी केली जात आहे. त्यावर निवडणूक आयोग गप्प बसले आहे. आता हे लोकं मतमोजणी दरम्यान नेटवर्क जॅमरची मागणी करत आहे. जेणेकरुन EVM मध्ये छेडछाड केली जाऊ शकेल.

एसीएस म्हणाले- जे EVM सापडले ते ट्रेनिंगसाठी होते.

अखिलेश यादव यांनी केलेल्या आरोपांवर, एसीएस नवनीत सहगल यांनी सांगितले की, वाराणसीमध्ये प्रशिक्षणासाठी, ईव्हीएम मंडीतील एका वेगळ्या गोदामातून यूपी कॉलेजमध्ये नेले जात होते. काही राजकीय लोकांनी हे वाहन थांबवून निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम म्हणत अफवा पसरवल्या आहेत. बुधवारी मतमोजणी कर्तव्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आहे. हे यंत्र नेहमी प्रशिक्षणासाठी वापरले जाते. निवडणुकीत कोणत्या ईव्हीएमचा वापर करण्यात आला. ते सर्व सुरक्षित खालीमध्ये सीआरपीएफच्या ताब्यात आहेत. तेथे सीसीटीव्हीची नजर आहे. सर्व राजकीय पक्षांचे लोक तिथे आहेत. असे सहगल म्हणाले आहे.

बातम्या आणखी आहेत...