आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Akhilesh Yadav Refuses Corona Vaccination, Says We Do Not Believe In BJP's Vaccine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीवरून राजकारण:अखिलेश यादव यांचा कोरोना लसीकरणाला नकार, म्हणाले - आम्हाला भाजपच्या लसीवर विश्वास नाही

लखनऊ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा सर्वांना मोफत लस दिली जाईल : अखिलेश यादव

देशातील नागरिकांना कोरोनाची मोफत लस मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. कोरोनाची लस सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं मेगा प्लॅन तयार केला आहे. मात्र काही नेत्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. अशात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कोरोनाची लस घेण्यास नकार दिला आहे. मी भाजपची कोरोना लस टोचून घेणार नाही, असे त्यांनी शनिवारी जाहीर केले.

भाजपची कोरोना लस टोचून घेणार नाही, असे समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे भाजपकडून आलेली लस आम्ही टोचून घेणार नाही. जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा सर्वांना मोफत लस दिली जाईल, मात्र आम्ही भाजपची लस टोचून घेऊ शकत नाही. असेही अखिलेश यादव म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...