आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akhilesh Yadav । Samajwadi Party President Akhilesh Yadav Will Not Contest The Assembly Elections 2022

विधानसभा 2022:समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव लढवणार नाही विधानसभा निवडणूक, अन्य पक्षांसोबत करणार युती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांनी पार पडणार आहे. त्यावर आता राजकीय पक्ष आपली कंबर कसण्यास सुरुवात करत आहे. निवडणूकीचे बिगूल वाजले नसतांना देखील, विधानसभा निवडणूकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी पक्षाची धडपड सुरु आहे.

मात्र समाजवादी पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नाही असे म्हटले आहे. अखिलेश सध्या आझमगढ या ठिकाणाहून खासदार असून, येणाऱ्या विधानसभेत राज्यातील छोट्या मोठ्या पक्षांसोबत युती करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय लोक दल यांच्यासोबत सध्या चर्चा सुरु असल्याचे देखील अखिलेश म्हणाले.

पुढे, योगी आदित्यनाथला धारेवर धरत अखिलेश म्हणाले की, योगी आदित्यनाथ हे सध्या राज्यभरात समाजवादी पार्टीने केलेली कामांची नावे बदलत आहे. आणि शौचालय बांधत आहे. हे दोनच कामे योगी करत असल्याची टीका अखिलेश यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...