आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुगाडच्या बाबतीत भारतीयांचा हात कुणी धरू शकत नाही. भारतीयांच्या हटके आणि भन्नाट जुगाडाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. असाच एक नवा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
अखिलेश यादव यांनी शेअर केला व्हिडिओ
जागेची बचत करण्यासाठी लोकांनी थेट महामार्गाच्या दुभाजकावरच गोवऱ्या रचून ठेवण्याच्या जुगाडाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ युपीतील असल्याचा अंदाज यावरून लावला जात आहे. या व्हिडिओत महामार्गाच्या मधोमध असलेल्या विस्तीर्ण दुभाजकावरच लोकांनी गोवऱ्या रचल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांनी या व्हिडिओला कसलेही कॅप्शन दिलेले नाही. केवळ व्हिडिओ त्यांनी टाकला आहे. हा व्हिडिओ त्यांनीच गाडीतून चित्रीत केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण या व्हिडिओत दिसणाऱ्या गाडीच्या बोनेटवर समाजवादी पक्षाचा झेंडा लागलेला दिसतो.
पावसाळ्यासाठी गोवऱ्यांचा करूड रचण्याची पद्धत
पावसाळ्यात जळणासाठी उन्हाळ्यातच गोवऱ्यांचा करूड लिंपून ठेवण्याची भारतीय पद्धत अतिशय जुनी आहे. आजही देशातील ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी जळणाची लाकडे, गोवऱ्यांचा साठा केला जातो. गोवऱ्यांचा करूड रचण्याची कला अतिशय अनोखी असते. गोवऱ्या एकावर एक अशा रितीने रचून ठेवल्या जातात. एका गोलाकार घुमटाच्या आकारात रचल्यानंतर तो वरून शेणाने लिंपून ठेवला जातो. मराठवाड्यातील ग्रामीण भागात याला गोवऱ्यांचा करूड असे म्हटले जाते. नंतर पावसाचे पाणी यात शिरू नये म्हणून वरून काठ्या आणि चाऱ्याचे छप्पर याला शेकारले जाते. त्यामुळे पावसाळ्यासह वर्षभर जळणासाठी कोरड्या गोवऱ्या उपलब्ध होतात.
ग्रामीण भागात सामान्यपणे चूल पेटवण्यासाठी गोवरीचा वापर केला जातो. गोवरीने चूल पेटवली जाते आणि नंतर त्यात लाकडे टाकून त्यावर अन्न शिजवतात.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.