आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Announces Multiplayer Game FAU G After Government Baned Chinese Mobile Game PUBG

PUBG चा पर्याय आला:अक्षय कुमारने केली FAU-G गेमची घोषणा; रेव्हेन्यूतील 20% 'भारत के वीर' ट्रस्टला जाणार

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने 2 सप्टेंबरला 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली, यात लोकप्रिय गेम पबजीचा समावेश

सरकारने 2 सप्टेंबरला 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली, यात लोकप्रिय गेम पबजीचा समावेश आहे. आता पबजीवर बॅन लागल्याच्या दोन दिवसानंतर अभिनेता अक्षय कुमारने पबजीला पर्याच म्हणून FAU-G गेम लॉन्च केला आहे. हा गेम खेळणाऱ्यांना देशातील जवानांच्या बलिदानाची माहितीदेखील दिली जाईल. हा अक्षय कुमारचा पहिला गेमिंग वेंचर आहे.

अक्षय कुमारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देताना म्हटले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाला समर्थन देत FAU-G गेम आणताना आनंद होत आहे. या गेममध्ये प्लेअर्स मनोरंजना व्यतिरिक्त सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती मिळवू शकतील. या गेममधून जे उत्पन्न येईल त्यापैकी 20 टक्के रक्कम भारत के वीर ट्रस्टसाठी दान केले जाईल', अशी घोषणा अक्षय कुमारने केली आहे.

गलवानमध्ये भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक मारामारीनंतर केंद्राने 29 जूनला 59 चीनी अॅप्स, 27 जुलै 47 अॅप आणि 2 सप्टेंबरला 118 अॅप्स बॅन केले. परंतू, पबजीचे मोबाइल आणि डेस्कटॉप व्हर्जन अजूनही उपलब्ध आहे. आता अक्षय कुमारच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर लोकांनी फौजीबाबत पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आहेत.ट्वीटरवर FAU-G ट्रेंड करत आहे. फक्त एका तासात याबाबत 20 हजारांपेक्षा जास्त ट्वीट्स करण्यात आले आहेत. हा गेम विशाल गोंदालच्या इंडिया गेम्स आणि बंगळुरूच्या एनकोर गेम्सने सोबत मिळून तयार केला आहे.