आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात दहशतवादी ठार:अमेरिकी ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या अयमान जवाहिरीचा खात्मा

रिफतउल्लाह ओरकझाई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कुख्यात दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी ठार झाला. रविवार,३१ जुलै रोजी सकाळी ६.१८ वाजता ही मोहीम फत्ते झाली. त्याची माहिती अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी दिली. आमच्या नागरिकांसाठी कुणी धोकादायक ठरणार असेल तर अमेरिका त्याचा शोध घेऊन खात्मा करेल, अशा शब्दांत बायडेन यांनी खणखणीत इशारा दिला आ‍हे.

अमेरिकी गुप्तचर संस्था सीआ‍यएने रविवारी अफगणिस्तानची राजधानी काबूलच्या शेरपूर या दाट नागरी वस्ती भागात मोहीम सुरू केली. या वेळी ड्रोन विमानाने दोन हेलफायर क्षेपणास्त्रे डागून जवाहिरीला उडवले. हल्ल्यावेळी तो घराच्या बाल्कनीत उभा होता. घरात जवाहिरीचे कुटुंबीयही होते परंतु इतरांना इजा झाली नाही.

जवाहिरी ठार झाल्याने भारतातील अल-कायदा समर्थकांना जोरदार झटका बसला आ‍हे. तथापि, अफगाणमध्ये आ‍श्रय मिळालेल्या भारतविराेधातील दहशतवादी संघटनांसाठी धोक्याची घंटा आ‍हे.

सैफ अल अदेल अल-कायदाचा नवा म्होरक्या सैफ अल अदेल हा अल-कायदा संघटनेचा नवा प्रमुख होऊ शकतो. तोही एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत आहे. सैफ हा अल कायदाच्या लष्करी समितीचा सदस्य आहे. त्याला जवाहिरीनंतर त्याच्या हाती संघटनेची सूत्रे येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...