आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा बदला घेण्यासाठी भारतावर आत्मघाती हल्ले करण्याची धमकी अल कायदा या अतिरेकी संघटनेने दिली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपी आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली आहे.
अतिरेक्यांवर नजर ठेवणारी संस्था फ्लॅशपाॅइंटचे संस्थापक इवेन कोलमॅन यांनी सोशल मीडियावर लिहिले की, अलकायदाने म्हटले की, भगव्या अतिरेक्यांनी दिल्ली, मुंबई आणि गुजरातमध्ये आपल्या अंताची प्रतीक्षा करावी. ज्यांनी पैगंबरांचा अवमान केला, आम्ही त्यांची ह्त्या करू. पाकिस्तानातील तालिबाननंतर अलकायदा ही धमकी देणारी दुसरी संघटना आहे.
उल्लेखनीय म्हणजे मोहंमद पैगंबर यांचे कार्टून छापल्यानंतर अलकायदाने पॅरिसमध्ये चार्ली हेब्दो मॅग्झिनच्या कार्यालयावर हल्ला केला होता. यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.
संघाच्या कार्यालयांना उडवण्याची धमकी देणारा अटकेत :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस तामिळनाडूच्या पुडुकुडीतून अटक करण्यात आली आहे. आरोपी राज मोहंमदने सोमवारी संघाच्या ६ कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. त्यात लखनऊची दोन कार्यालये होती. धमकी व्हॉट्सअॅपवर देण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.