आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रदूषण आपणास गंभीर आजारी करू शकते. प्रदूषण देशात दर तीन मिनिटांत तीन जणांचा प्राण घेत आहे. डेन्मार्कच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगनच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार, प्रदूषित शहरात केवळ ३ वर्षांपर्यंत राहणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ४३% पर्यंत वाढला आहे. १५ ते २० वर्षांपर्यंत केलेल्या अभ्यासानुसार, महिलांमध्ये स्मृतिभ्रंश, लठ्ठपणा आणि वंध्यत्व यासारख्या आरोग्य समस्यांचाही संबंध कुठे ना कुठे प्रदूषणाशी आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या विश्लेषणानुसार, प्रदूषणामुळे भारतातील नागरिकांचे सरासरी वय ७ वर्षांपर्यंत कमी झाले आहे. डब्ल्यूएचओचे मापदंड पूर्ण केल्यास सरासरी ५.५ वर्षांपर्यंत वय वाढू शकते. शास्त्रज्ञांनुसार, पीएम २.५ मुळे जगात दरवर्षी ७० लाख मृत्यू होतात. प्रदूषणामुळे भारताला वार्षिक ११.२५ लाख कोटींचे आर्थिक नुकसान होते.
बचाव...एअर प्युरिफाइंग रोपे लावा, घरात व्हेंटिलेशन ठेवा
घरात स्वच्छ हवेसाठी नैसर्गिक रोपे लावा. जसे- कोरफड, आयव्ही, मनीप्लँट, सेन्सेव्हिएरा आणि स्पायडर प्लँट. ही रोपे प्रदूषित हवा स्वच्छ करतात. घराच्या खिडक्या उघडा, जेणेकरून हवेचे व्हेंटिलेशन राहील.
सकाळ-सायंकाळ मोकळ्या जागेत जड व्यायाम करू नका, प्रदूषण जास्त असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.