आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरजवळ ४ मे रोजी लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले होते. आता संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून ध्रुव हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या दोन अपघातानंतर ही हेलिकॉप्टर्स ग्राउंड करण्यात आली आहेत. ही हेलिकॉप्टर उडवून एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.
4 मे रोजी झाला होता अपघात
जम्मू विभागातील किश्तवाडमधील दुर्गम भागात लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यात तीन जण होते. तिघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले.
या प्रकरणाबाबत लष्कराकडून दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी 11.15 च्या सुमारास ऑपरेशनल मिशनवर निघालेल्या ध्रुव हेलिकॉप्टरला किश्तवाडमधील मरुआ नदीच्या काठावर उतरताना अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (एटीसी) तांत्रिक बिघाडाची माहिती दिली होती.
काही वेळातच बचावकार्य घटनास्थळी दाखल
लष्कराचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. विमानात दोन पायलट आणि एक तंत्रज्ञ होते. तिन्ही जखमी जवानांना उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत
उल्लेखनीय म्हणजे, 16 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशमधील बोमडिला चीता हेलिकॉप्टरचा एटीसीशी संपर्क तुटल्याने अपघात झाला होता. या अपघातात दोन्ही पायलट, लेफ्टनंट कर्नल विनय बानू रेड्डी आणि मेजर जयंता ए यांचा मृत्यू झाला होता. अपघाताचे कारण शोधण्यासाठी या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.