आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:केंद्रीय विद्यालयांत खासदार वगळता सर्व प्रवेश कोटे रद्द

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय विद्यालयांत प्रवेशासाठी आता खासदार वगळता इतर कोणासाठीही कोटा राहणार नाही. यानुसार एक खासदार आपल्या लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय विद्यालयांत एका शैक्षणिक सत्रात जास्तीत जास्त १० मुलांना प्रवेश देऊ शकेल.

सूत्रांनुसार, राज्यसभा सदस्यांसाठीही १० विद्यार्थ्यांचा हा कोटा असणार आहे. पूर्वी खासदार कोट्यातून ६ मुलांना प्रवेश दिला जात होता. तो २०१६-१७ पासून १० करण्यात आला आहे. सरकारने कंेद्रीय शिक्षण मंत्रालयाचा प्रवेशासाठीचा कोटाही कमी केला आहे. पूर्वी शिक्षण मंत्री ४५० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत होते. मात्र, प्रत्यक्षात याहून अधिक मुलांसाठी शिफारस केली जात असे. २०१८-१९ मध्ये ८ हजार प्रवेश या मंत्रालयाच्या शिफारशींवर झाले होते.

मंत्री कोटा स्मृती इराणी यांनी केला होता बहाल
२०१० मध्ये यूपीए सरकारमधील तत्कालीन मंत्री कपिल सिब्बल यांनी मंत्री व खासदारांसाठीचा हा कोटा रद्द केला होता. त्याला खासदारांनी विरोध केला होता. दोन महिन्यांत हा निर्णय फिरवावा लागला. तेव्हा खासदारांना कोटा मिळाला, परंतु मंत्र्यांना हा कोटा दिला गेला नव्हता. २०१४ मध्ये एनडीए सरकारच्या काळात मंत्री स्मृती इराणी यांनी मंत्र्यांनाही प्रवेशासाठीचा हा कोटा बहाल केला होता.

बातम्या आणखी आहेत...