आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All Corona Hospitals Should Take 'Fire NOC', Otherwise States Should Take Strict Action: Court

नवी दिल्ली:सर्व कोरोना रुग्णालयांनी ‘फायर एनओसी’ घ्यावी, अन्यथा राज्यांनी कडक कारवाई करावी : काेर्ट

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या राजकोटमध्ये कोरोना रुग्णालयात झालेल्या अग्निकांडानंतर सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व कोरोना रुग्णालयांत फायर सेफ्टीबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत.

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने देशातील सर्व कोरोना रुग्णालयांनी अग्निशमन दलाकडून त्वरित एनओसी घ्यावी, असे निर्देश दिले. रुग्णालयांनी चार आठवड्यांच्या आत फायर एनओसी घेतली नाही तर राज्य सरकारांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. त्याव्यतिरिक्त राज्य सरकारांनी प्रत्येक रुग्णालयात एक नोडल अधिकारी नियुक्त करावा, असेही निर्देश दिले.

२ दिवसांत डॉक्टरांना ब्रेक देण्याबाबत माहिती देणार
न्या. शहा यांनी केंद्राकडे पुन्हा एकदा कोरोना रुग्णालयांतील डॉक्टरांना ब्रेक देण्याबाबत विचारणा केली. ब्रेकबाबत केंद्राने काय केले आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, केंद्र या मुद्द्यावर विचार करत आहे. दोन दिवसांत शपथपत्र दाखल केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...