आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदींच्या बैठकीत सूचना:सर्व रुग्णालयांनी फायर ऑडिट करावे

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी साेमवारी उन्हाळी ऋतूसंबंधी तयारीच्या आढाव्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. सर्व रुग्णालयांनी विस्तृत फायर ऑडिटवर भर दिला पाहिजे. अग्निशमन दलाने सर्व रुग्णालयांत माॅक ड्रील करावे, अशा सूचना बैठकीत पंतप्रधानांनी दिल्या. आगामी दाेन महिन्यांमध्ये हवामानाचे पूर्वानुमान व सामान्य मान्सूनची शक्यता आणि रब्बी पिकाची माहिती देण्यात आली.

हवामान विभागाने अंदाज वर्तवताना ते सहजपणे समजतील आणि त्याचा प्रसार हाेईल याची खबरदारी घ्यावी. उन्हाळ्याच्या ऋतूसाठी प्राेटाेकाॅल म्हणजे काय करावे, काय करू नये हे सुटसुटीतपणे तयार केले जावे. सर्व शाळांनी उष्णतेचे प्रमाण वाढल्यावर त्यावरील उपयायाेजनेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवावी, अशा सूचना माेदींनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...