आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All India Weather Update Maharashtra UP MP Hit | Average Temperature In May, Pre monsoon Rains And Snowfall In The Hilly Regions

मे मधील उकाडा सुरू:72 तासांत दिल्ली, मप्र, राजस्थानसह अनेक राज्यांत पारा 9 डिग्रीपर्यंत चढला

दिव्य मराठी नेटवर्क| नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनपूर्व पाऊस आणि डोंगरी प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे या वर्षी मेमध्ये सरासरी पा १५ डिग्रीपर्यंत कमी राहिला. गेल्या वर्षी मे मध्ये देशातील सरासरी तापमान ४३.५ डिग्री सेल्सियस होते. ते या वर्षी २८.७ राले. ५ मे २०२२ रोजी ३९.१ डिग्री सेल्सियस होते, जे या वर्षी ३२.१ डिग्री सेल्सियस राहिले.

मोचा भीषण चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण वादळ समुद्रावर १२० किमी प्रतीघंटा वेगाने चालणाऱ्या हवेसोबत खूप गंभीर चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. मोचा ११ मे पर्यंत मई तक उत्तर-उत्तर पश्चिमकडे आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे.
पुढे काय... १० राज्यांत पाऊस, १७ राज्यांत पारा चढणार: उत्तर भारतासह पूर्व आणि पश्चिम भारतात सातत्याने तापमान वाढत आहे. तर दक्षिणेकडील राज्यांत पाऊस होत आहे. हवामान विभागाने सांगितले की, १० राज्यांत पावसाचा अंदाज असून १७ राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ बघायला मिळेल.

राजस्थानच्या बाडमेरला पारा ४३ डिग्रीच्याही पुढे
उत्तर मध्य भागासह देशातील बहुतांश भागात अचानक उष्णता वाढली आहे. परिस्थिती अशी झाली की, केवळ ७२ तासांत दिल्लीसह अनेक राज्यांतील तापमान ५ अंश सेल्सियसवर वाढले. मध्य प्रदेशात सोमवारी सहा ठिकाणी पारा ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक होता. १२ मे रोजी ३९ अंशांच्या वरच होता. हवामान विभागाच्या मते या आठवड्यात देशात बहुतांश भागात उष्णतेची लाट येईल. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य भारतात पारा ४५ अंश सेल्सियसच्या वर जाण्याचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि लगतच्या परिसरात पारा ४० डिग्रीच्या वर जाईल.

वळण : अहमदाबादेत मोठा उकाडा, रायपूर तापले
शहर 6 मे 9 मे जाणवले
दिल्ली 35.90 390 410
जयपूर 35.30 420 430
पाटणा 330 420 430
रांची 320 390 410
भोपाळ 320 40.20 420
रायपूर 36.40 420 460
अहमदाबाद 370 430 450
छ. संभाजीनगर 33.50 310 310
(आकडे डिग्री से. मध्ये)

पश्चिम बंगालमध्ये उष्म्याची लाट
मोचा चक्रीवादळामुळे बंगालमधील पारा आणखी वाढला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते १३ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेला. सिक्कीमही प्रचंड तापत आहे.

हिमवृष्टी : केदारनाथला जाण्यापूर्वी हवामान बघा
केदारनाथमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी पाहता रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने मंगळवारी तीर्थयात्रेकरूंसाठी सल्ला जारी केला आहे. त्यांनी हवामानाची माहिती घेतल्यानंतरच मंदिराची यात्रा करावी. त्यांच्यासाठी भाविकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.