आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील क्रीडा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग बंधनकारक शेअरिंग कायद्याची व्याप्ती वाढवली आहे. आता खासगी क्रीडा प्रसारकांना सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीसोबत भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचे सर्व सामन्याचे (वनडे, टी-२०, कसोटी) सामायिक करावे लागतील. म्हणजेच आता या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट््सवर होणार आहे. अधिसूचनेनुसार, भारतातील सर्व क्रिकेट कसोटी सामने आता क्रीडा कायद्याच्या कक्षेत आहेत.
- करार मालकांना आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धेचे उपांत्य व अंतिम सामने दाखवावे लागतील. पुरुष व महिला आशिया चषकाचे (वनडे, टी-२०) उपांत्य व अंतिम लढती सामायिक करावी लागेल. - १९ वर्षांखालील विश्वचषकाचे सामने ज्यात भारत सहभागी होईल, तेही शेअर करावे लागतील. त्याचे उपांत्य व अंतिम सामनेदेखील अनिवार्य शेअरिंग यादीत समाविष्ट केले आहे. - सर्व ऑलिम्पिक सामने, कनिष्ठ हॉकी विश्वचषक (भारत यजमान असल्यास) कायद्यांतर्गत आणला आहे. - आशियाई महिला फुटबॉल चषक व भारतात होणारा १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकदेखील डीडी स्पोर्टसवर प्रसारित होईल. - फिफा वर्ल्डकपचे उद्घाटन, उपांत्य व अंतिम सामनेदेखील डीडी स्पोर्टसवर दाखवले जातील. - संतोष ट्रॉफी, नेमबाजी विश्वचषक, राष्ट्रकुल नेमबाजी, तिरंदाजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचेदेखील सामायिक केले. - मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा संघटनेतर्फे आयोजित देशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धाही दिसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.