आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All Night Protest Against T. Raja's Bail 4 Injured Including A Police Inspector, Suspended BJP MLA Had Made Comments On Paigamber

टी. राजांच्या जामीनाविरोधात रात्रभर आंदोलन:पोलिस निरीक्षकासह 4 जण जखमी, भाजप आमदाराने केली होती पैगंबरांवर टिप्पणी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी. राजा सिंह यांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली, मात्र रात्रीपर्यंत त्यांना जामीनही देण्यात आला. याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी रात्रभर निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकासह चार जण जखमी झाले आहेत.

मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लिम तरुणांनी गोशामहलच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यातच थांबवले. अंबरपेट, तल्लाबकट्टा, मोगलपुरा, खिलवत, बहादूरपुरा आणि चंचलगुडा याठिकाणी आंदोलकांनी गोंधळ घातल्याच्या बातम्या समोर आल्या.

भाजपने राजा सिंह यांना निलंबित केले

भाजपने टी. राजा सिंह यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्याच्यावर भादंविच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आधी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते, मात्र नंतर न्यायालयाने कोठडीचा आदेश मागे घेत जामीन मंजूर केला. टी राजा यांनी मंगळवारी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद असणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र, नंतर त्यांनी या गोष्टीला विनोदात केल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ माजला. आणि मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

टी. राजा सिंह यांना भाजपने पक्षातून निलंबित करण्याची नोटीस बजावली आहे.
टी. राजा सिंह यांना भाजपने पक्षातून निलंबित करण्याची नोटीस बजावली आहे.

संतप्त जमावाने दिल्या 'मुंडके वेगळे करा'च्या घोषणा

टी. राजा यांच्या वक्तव्याविरोधात हैदराबादमध्ये सोमवारी रात्रीपासून निदर्शने सुरू आहेत. संतप्त जमावाने गोशामहल येथे 'गुस्ताखे नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा' अशाप्रकारची घोषणाबाजी करत आमदार टी. राजा यांच्या अटकेची मागणी केली होती. विरोधकांनी टी राजा यांच्या विधानाची भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाशी तुलना केली.

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले

आंदोलकांनी टी. राजा सिंह यांच्याविरोधात डबीरपुरा पोलिस ठाण्यात आयपीसीच्या 295(अ), 153(अ) सह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. मात्र वाढता हिंसाचार पाहता पोलिसांनी अनेक आंदोलकांनाही ताब्यातही घेतले. हैदराबादचे पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय आणि जुन्या पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टी. राजा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.
टी. राजा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.

ओवेसी म्हणाले- भाजपला दंगल घडवायची आहे

राजा सिंह यांच्या कथित वक्तव्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले 'मी भाजप आमदाराच्या वक्तव्याचा निषेध करतो. भाजपला तेलंगणा आणि हैदराबादची शांतता बिघडवायची आहे आणि इथे जातीय दंगली घडवायच्या आहेत.'

कॉमेडियन मुनव्वर फारुकी विरोधात टाकला होता व्हिडिओ

टी. राजा सिंह यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.
टी. राजा सिंह यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.

भाजप आमदाराने कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्याविरोधात व्हिडिओ पोस्ट केला होता. मुनव्वरने गेल्या आठवड्यातच हैदराबादमध्ये एका कॉमेडी शोमध्ये परफॉर्म केले होते. याआधी राजा सिंह यांनी फारुकीचा शो बंद करून सेट पेटवून देण्याची धमकी देखील दिली होती. राजा सिंह यांचे म्हणणे होते की, मुनव्वर फारुकी यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या धमकीनंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

27 मे रोजी नुपूर शर्माने पैगंबरावर टिप्पणी केली होती

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी 27 मे रोजी एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद साहब यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यामुळे भाजपने त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले. नुपूर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टानेही नुपूर शर्मा यांना फटकारले होते. नुपूर यांनी टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात एका विशिष्ट धर्माविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यांनी लोकांच्या भावना भडकवल्या असून देशभरात जे काही घडत आहे त्याला नुपूर जबाबदार आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे. असेही न्यायालयाने म्हटले होते

बातम्या आणखी आहेत...