आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षा पॅटर्न:सीए परीक्षेत सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ; परीक्षकांचीही घेतली जाणार चाचणी

उदयपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) सीए परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आयसीएआयचे केंद्रीय परिषद सदस्य प्रमोदकुमार बुब यांच्यानुसार परीक्षा वस्तुनिष्ठ पॅटर्ननुसार घेण्याचा प्रस्ताव आहे. सध्या ती ३०% ऑब्जेक्टिव्ह आणि ७०% सब्जेक्टिव्ह आहे. वस्तुनिष्ठ पॅटर्नमुळे उत्तरपत्रिका तपासण्यात कमी वेळ लागेल. यामुळे वर्षभरात परीक्षेच्या संधीही वाढवल्या जातील. म्हणजे मे आणि डिसेंबरशिवाय इतर वेळीही परीक्षा घेतल्या जाऊ शकतात.

आणखी दोन बदल...
- निकालानंतर अर्ज केल्याच्या ७० दिवसांत उत्तरपत्रिका मिळते. आता ७ दिवसांतच बघता येईल.
- उत्तरपत्रिका तपासण्याआधी परीक्षकांनाही चाचणी द्यावी लागेल. प्रश्नपत्रिकेत २५ प्रश्न असतील, त्यातील १८ ची उत्तरे द्यावी लागतील. ७२% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यास उत्तरपत्रिका तपासायला दिली जाईल.