आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • All Shopkeepers And Vegetable Sellers In The Country Will Be Tested For Corona, The Health Ministry Said

कोरोना टेस्ट:देशातील सर्व दुकानदार, भाजीपाला विक्रेत्यांची कोरोना चाचणी होणार, आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून राज्यातील सर्व किराणा दुकानदार, त्यांच्याकडील कर्मचारी, भाजीपाला विक्रेते आणि इतर सर्व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश िदले आहेत.

केंद्र सरकारनुसार, यापैकी कोणाचीही चाचणी न झाल्यास त्याच्यामुळे इतर जणांनाही कोरोना संसर्ग होऊ शकतो. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, सर्व राज्यांनी ऑक्सिजन सुविधा आणि तत्काळ रुग्णवाहिका सेवेची सुविधा करावी.तसेच रुग्णवाहिकेचीही रोज देखरेख ठेवावी.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल २१ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. आजवर देशात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ लाखांवर रुग्ण बरे झाले आहेत.

0