आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All The Standards Are Met, The Meteorological Department Can Announce In Some Time; Was Stuck In Sri Lanka Since May 27; News And Live Updates

मान्सूनचे केरळमध्ये आगमन:दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मान्सून अखेर केरळमध्ये दाखल; स्कायमेटचा अंदाज - यंदा 103% होणार पाऊस

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • जोरदार वाऱ्यांअभावी 27 मेपासून श्रीलंकेत खोळंबला होता मान्सून

मान्सून गुरुवारी केरळच्या किनाऱ्यावर धडकेल, अशी शक्यता आहे. हवामान विभागानुसार मान्सूनच्या आगमनाला दुजोरा देणारी तीनपैकी दोन मानके पूर्ण झाली आहेत. गुरुवारी सॅटेलाइटद्वारे आऊटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशनचा (ओएलआर) आकडा मिळताच मान्सून धडकल्याची घोषणा होऊ शकते. गुरुवारी रेडिएशनचे मानकही पूर्ण होईल, अशी अपेक्षा हवामानतज्ज्ञ आर. के. जेनामेनी यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, यंदा मान्सून वेळापत्रकानंतर 2 दिवस उशीर आहे. परंतु, या वेळी पाऊस सामान्यपेक्षा 103% अधिक असल्याचा अंदाज खासगी एजन्सी स्कायमेटने वर्तविला आहे.

जोरदार वाऱ्यांअभावी 27 मेपासून श्रीलंकेत खोळंबला होता मान्सून
मान्सूनचे 21 मे रोजीच अंदमान-निकोबारमध्ये आगमन झाले होते. पण 27 मे रोजी अर्ध्यापेक्षा जास्त श्रीलंका व मालदीव व्यापूनही जोरदार वाऱ्यांअभावी 7 दिवसांपर्यंत मान्सूनची उत्तर सीमा कोमोरिन सागरातच थांबली होती. आता स्थिती अनुकूल आहे. आगमन झाल्यानंतर मान्सून वेगाने आगेकूच करेल आणि एका आठवड्यात बऱ्याच अंशी विलंबाची भरपाई करेल, अशी अपेक्षा आहे. यंदा पावसाळ्याच्या 4 महिन्यांत सामान्य सरासरीच्या 101% पाऊस होईल, असा अंदाज आहे.

निरोप घेऊन आलेल्या ढगांची काश्मीरमध्ये वर्दी!
जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. श्रीनगरमध्ये दल सरोवरावरील ढग आणि पावसाच्या हलक्या थेंबांमुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे.

मान्सून घोषित करण्याचे हे मानक आहेत

  • केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकमधील 14 हवामान केंद्रांपैकी 60% मध्ये 10 मे नंतर सलग दोन दिवस 2.5 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे.
  • पश्चिम दिशेच्या सपाटीपासून साडेचार किमी उंचीपर्यंत वेगाने वारे वाहू लागतील, वारा वेग जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळपास 30 ते 35 किमी पर्यंत असेल.
  • ढगांची जाडी इतकी असावी की, जमिनीवरून आकाशात परत येणारे रेडिएशन प्रति चौरस मीटरपेक्षा 200 वॅटपेक्षा कमी असेल.
बातम्या आणखी आहेत...