आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All Three Opposition Candidates Withdrew From The Presidential Election, Latest News And Update

विरोधकांच्या उमेदवारांची राष्ट्रपती निवडणुकीतून माघार:पवार-अब्दुल्लांनंतर गांधींच्या नातवाचाही नकार, उद्या पुन्हा विरोधकांची बैठक

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विरोधकांच्या ऐक्याची गाठ सैल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नॅश्नल कॉन्फ्रंसचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर आता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल तथा महात्मा गांधींचे नातू गोपाल कृष्ण गांधी यांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा चेहरा बनण्यास नकार दिला आहे.

गोपाल कृष्ण गांधी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल व महात्मा गांधींचे नातू आहेत.
गोपाल कृष्ण गांधी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल व महात्मा गांधींचे नातू आहेत.

विरोधी पक्षांचा उमेदवार विरोधी ऐक्यासह राष्ट्रीय सहमती व राष्ट्रीय वातावरण निर्माण करणारा असावा. अशी क्षमता असणारे अनेक नेते उपलब्ध आहेत, असे मला वाटते, असे गोपाल कृष्ण गांधी म्हणाले.

ममतांनी 15 जून रोजी ठेवला होता प्रस्ताव

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 15 जून रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीत पवार, गांधी आणि अब्दुल्ला यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, दुसऱ्या बैठकीपूर्वीच या तिन्ही चेहऱ्यांनी त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला. आता शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली 21 जून रोजी पुन्हा एकदा विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीपासून ममता अंतर राखण्याची शक्यता आहे.

29 जून उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख

गांधींपूर्वी शरद पवार व फारुख अब्दुल्लांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख 29 जून आहे. त्यामुळे आता अर्ज दाखल करण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यानंतरही अद्याप विरोधकांचा उमेदवाराचा शोध संपला नाही.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. तर 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर लगेचच नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाईल. 2017 मध्ये राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले देशाचे 15 वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

यामुळे आहे NDA मजबूत

एनडीए बहुमताच्या अगदी जवळ आहे. त्यांना केवळ बीजेडीचे नवीन पटनायक व वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीएचे पारडे जड आहे.

दरम्यान, गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएची कामगिरी अत्यंत चांगली झाली होती. त्यात रामनाथ कोविंद यांना 65.35% मते मिळाली होती. यावेळीही त्याची पुनरावृत्ती करण्याचा एनडीएचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...