आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All weatherroad Leading To Indo China Border Swept Away, 57 year old Bridge Collapses

डेहराडून:भारत-चीन सीमेपर्यंत जाणारा ऑल वेदर राेड वाहून गेला, 57 वर्षांपूर्वीचा पूल काेसळला, दाेन पर्यटकांचा मृत्यू

डेहराडून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस, राष्ट्रीय महामार्ग बंद

उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हाेणाऱ्या पावसामुळे राजधानी डेडराडूनसह ८ जिल्ह्यांत पाणीच पाणी झाले आहे. ग्रामीण भागाला पाण्याने वेढा दिला आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद झाले आहेत. अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे हजाराे लाेक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. त्याचबराेबर एक वाहन नदीत काेसळल्याने दिल्लीच्या दाेन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ढगफुटी व मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये सर्वाधिक फटका ऑल वेदर राेड व डेहराडून-हृषीकेशला जाेडणाऱ्या रानी पाेखरी पुलास बसला आहे. हृषीकेश-गंगाेत्री महामार्गावर फकाेटजवळ ऑल वेदर राेडचा सुमारे १०० मीटरचा भाग वाहून गेला आहे. या मार्गाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले हाेते. हृषीकेश-बद्रीनाथ महामार्ग शिवपुरी, ताेताघाटीमध्ये ढिगारा वाहून आल्याने बंद झाला आहे.

दाेन्हीही भारत-चीन सीमेपर्यंत जाण्याचे प्रमुख मार्ग आहेत. परंतु ते आता बंद पडले आहेत. हा रस्ता पूर्ववत हाेण्यासाठी एखादा महिना लागू शकताे. डेहराडूनला हषीकेशशी जाेडणारा ५७ वर्षांपूर्वीचा रानी पाेखली पूलही काेसळला. हा पूल जाखना नदीवर आहे. पुलावरून वाहने जात असतानाच हा पूल काेसळला हाेता. त्यात चार वाहने नदीपात्रात काेसळली. यादरम्यान काही लाेकांनी वाहने तशी साेडून स्वत:चे प्राण वाचवले. परंतु पाण्याच्या प्रवाहात काही दुचाकी चालक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. काेपलेल्या नदीत शाेधमाेहीम राबवण्यात येत आहे. काही भागात रस्ते वाहून गेल्याने हजाराे लाेक अडकले आहेत. नैनिताल, चंपावत, उधमसिंहनगर, बागेश्वर, पिठोरागडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय डेहराडून, टिहरी, पाैडी जिल्ह्यांत यलाे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...