आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एक्सप्लेनर:भारतीय भूमीवर लँड झालेल्या फायटर राफेलविषयी जाणून घ्या सर्व काही, जे तुम्हाला अवश्य माहिती असावे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 वर्षांनंतर देशाला मिळाला नवा फायटर, शॉर्टलिस्ट झाल्यानंतर भारतात पोहोचण्यासाठी लागले आठ वर्षे
  • अंबाला एअरबेसवर राफेलच्या पहिले जगुआर आणि मिग-21 बायसन सारख्या लढाऊ विमानांनाही केले गेले आहे तैनात

22 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. फ्रान्सचे लढाऊ राफेल भारतीय भूमीवर उतरल्यानंतर देशाला नवीन लढाऊ विमान मिळाले. सकाळपासूनच ट्विटरवर #RafaleInIndia ट्रेंड होत आहे. त्याचबरोबर मंगळवारपासून अंबालामध्ये राफेलच्या स्वागतासाठी तयारीही सुरू होती. बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लोकांना छतावर जाण्यास आणि फोटो-व्हिडिओ न घेण्याची विनंती करण्यात आली होती.

22 वर्षांपूर्वी देशाला कोणते फायटर मिळाले होते?

8 ऑक्टोबर रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन राफेलची पूजा केली होती. त्या पूजेनंतर 9 महिने 21 दिवसानंतर, राफेल हरियाणाच्या अंबाला एअरबेसवर तैनात होत आहे. भारत दैसो एव्हिडएशनमधून जे 36 राफेल फायटर जेट करत आहे. त्यामधील आता केवळ 5 मिळाले आहे. उर्वरीत 31 जेट 2022 पर्यंत मिळण्याची आशा आहे. यापूर्वी भारताने 1997-98 मध्ये रुसमधून सुखोईची खरेदी केली होती. तीन वर्षांनंतर म्हणजेच 2001 मध्ये नवीन फायटर जेट खरेदी करण्याचा निर्णय झाला. 14 वर्षांनंतर 2012 मध्ये राफेल शॉर्टलिस्ट झाले. परंतु भारतात येण्यासाठी याला आठ वर्षे लागली.

अंबालामध्येच का तैनात होत आहेत राफेल?

अंबाला एअरबेस भारताच्या पश्चिम सीमेपासून 200 कि.मी. अंतरावर आहे आणि पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसच्याही जवळ आहे. येथे तैनात केल्याने पश्चिम सीमेवर पाकिस्तानविरूद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात सक्षम होईल. चीनच्या सीमेपर्यंत या एअरबेसचे अंतरही 200 किमी आहे. अंबाला एअरबेसपासून 300 किमी अंतरावर लेहच्या समोर चीनचे न्गारी गर गुंसा एअरबेस आहे. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे एअरबेसवर राफेलच्या अगोदर जगुआर आणि मिग -21 बाइसन सारख्या लढाऊ विमानांनाही तैनात केले गेले आहे.

पहिल्या राफेलची लँडिंग ग्रुप कॅप्टन हरकीरत यांनी केली, पत्नी अंबालामध्ये विंग कमांडर

5 विमानांच्या बॅचमध्ये सर्वात पहिले विमनाला वायुसेनेच्या 17 वी गोल्डन एरो स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर आणि शौर्य चक्र विजेता ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंह यांनी लँड केले. यानंतर इतर 4 राफेल लँड होतील. 23 सप्टेंबर 2008 ला इंजीन खराब असूनही जीव धोक्यात घालून विमान सुरक्षित लँड करण्यासाठी त्यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांची पत्नीही एअरफोर्समध्ये विंग कमांडर आहेत. सध्या त्या अंबालामध्ये पोस्टेड आहेत.

परमाणु क्षेपणास्त्र वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे वेगळे ठरते राफेल

राफेल हवेत फक्त ताशी 2 km किमी वेगाने वेगवान उड्डाण करण्यासोबतच 1,915 किमी प्रति तासाचा वेग वाढवू शकतो. हे हवेतून हवेमध्येच हल्ला करु शकते. यासोबतच हवेतून जमिनीवर आक्रमण करण्यास देखील सक्षम आहे. हे केवळ चपळच नाही तर त्यामुळे अण्वस्त्र हल्ला देखील केला जाऊ शकतो. पाकिस्तानचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान एफ -16 आणि चीनचा जे -20 मध्ये एवढ्या सुविधा नाहीत.

अंबालाच्या लोकांच्या आयुष्याचा भाग बनणार हे वादळ

राफेलचा अर्थ वादळ असा होतो. अंबालाच्या लोकांना येणाऱ्या काही महिन्यांपर्यंत रात्रंदिवस हे वादळ दिसणार आहे. कारण हे इथे पोहोचल्यानंतर भारतीय वायुसेना यावर राउंड द क्लॉक ट्रेनिंग करणार आहे. ही ट्रेनिंग या विमानासंबंधीत प्रत्येक सेक्शनची असेल. अबाला एअरबेसमधून रिटायर झालेल्या सार्जेंट खुशबीर सिंह यांनी सांगितले की, 80 च्या दशकात जेव्हा ते नोकरी करत होते. तेव्हा जगुआर फायटर प्लेन भारतात आले होते. तेव्हा पायलट आणि तांत्रिक स्टाफने रात्रंदिवस ट्रेनिंग घेतली होती.

पाकिस्तान आणि चीनची झोप उडवेल राफेल

अंबाल्चाय एक्स सर्व्हिसमेन वेलफएअर कमेटीचे प्रधान अत्र सिंह मुल्तानी यांनी म्हटले की, राफेल येण्याने पाकिस्तान आणि चीनची झोप उडेल. भारताला असे फायटर मिळाले आहे जे खूप शक्तीशाली आहे. हे शत्रूच्या टार्गेटला सिलेक्ट करुन त्याला उद्धवस्त करु शकते.

स्वागतात काही ठिकाणी ठोल वाजवले तर काही ठिकाणी वाटले लाडू

अंबाला एअरफोर्स स्टेशनवर मंगळवारपासून कडेकोट बंदोबस्त होता. सकाळपासून हेलिकॉप्टर सतत एअरपोर्स स्टेशनच्या वर उड्डाण भरत आहेत. ठिकठिकाणी पोलिस तैनात आहे. राफेल येण्यापूर्वीच शहरात जल्लोष सुरू झाला. ढोलच्या तालावर तिरंगा फडकावण्यात आला. या निमित्ताने माजी सैनिकांनी ठेका धरला. राफेल येण्याच्या आनंदात आमदार असीम गोयल यांनी लाडू वाटले.