आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Allahabad BJP MP Rita Bahuguna Joshi Granddaughter Burnt To Death By Firecrackers | Update From Uttar Pradesh Allahabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्काळजीपणा ठरला जीवघेणा:भाजप खासदार रीता बहुगुणांच्या 8 वर्षांच्या नातीचा मृत्यू, दिवाळीच्या रात्री फटाक्यांनी भाजली होती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवाळीच्या निमित्ताने जोशी कुटुंब प्रयागराजमध्ये आपल्या घरी आले होते
  • छतावर इतर मुलांसोबत फटाके फोडत होती खासदारांची नात, तेव्हाच झाली दुर्घटना

इलाहाबाद लोकसभा सीटवरील भाजप खासदार रीता बहुगुणा जोशींच्या आठ वर्षांच्या नातीचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. दिवाळीच्या रात्री फटाके पेटवताना मुलगी भाजली होती. यानंतर तिच्यावर प्रयागराज येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची प्रकृती सुधारत नसल्याने कुटुंबियांना तिला दिल्लीला न्यायचे होते. मात्र त्यापुर्वीच मुलीने प्राण सोडले. ही खासदारांचा मुलगा मयंक जोशीची मुलगी होती.

ड्रेसने घेतला होता पेट, छतावर भाजली
इलाहाबाद खासदार रीता बहुगुणा जोशींचे संपूर्ण कुटुंब दिवाळीच्या निमित्ताने प्रयागराजमध्ये आपल्या म्योर रोड येथील घरी आले होते. शनिवारी रात्री मुलगी किया दुसऱ्या मुलांसोबत घराच्या छतावर खेळायला गेली. त्याच वेळी फटाक्यांनी तिच्या ड्रेसने पेट घेतला आणि ती गंभीर जखमी झाली.

कपड्यांमध्ये आग लागल्यानंतर मुलीने ओरडण्यास सुरुवात केली, पण घरातील लोकांना वाटले की, मुल खेळत आहेत म्हणून आाज करत आहेत. यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही आणि कुणीही तिला पाहयाला गेले नाही. खूप वेळानंतर कुणीतरी छतावर गेले तेव्हा ती गंभीर भाजली होती.

बातम्या आणखी आहेत...