आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्यावरून अजान मूलभूत अधिकार नाही:अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा; कोर्ट म्हणाले -अजान इस्लामचा भाग, भोंगा नाही

प्रयागराज23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी भोंग्यावरुन अजान देण्याची मागणी करणारी एक याचिका धूडकावून लावली. भोंग्यावरुन अजाण देणे मुलभूत अधिकार नसल्याचे कोर्टाने या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे. "अजान इस्लामचा भाग आहे, भोंगा नाही," असे कोर्ट म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या बयायूंतील इरफान नामक व्यक्तीने एका याचिकेद्वारे अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे नूरी मशिदीतून भोंग्यावरुन अजान देण्याची परवानगी मागितली होती. पण, न्यायमूर्ती बी.के विडला व न्यायमूर्ती विकास यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

उल्लेखनीय बाब म्हणजे उत्तर प्रदेश व महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत लाउडस्पीकरच्या मुद्यावरुन मोठा वाद सुरू आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यातील अनेक मंदिर व मशिदींवरील भोंगे काढलेत. याशिवाय अनेक धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा आवाजही कमी केला आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातही भोंग्यावरुन देण्यात येणाऱ्या अजानच्या मुद्यावर मुस्लिम धर्मगुरुंनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यापुढे सकाळची अजान भोंग्यावरुन दिली जाणार नाही. मुंबईच्या सुप्रसिद्ध सुन्नी बडी मशिद मदनपुरा व मिनारा मशिदीतून सकाळी अजान देण्यात आली. पण, यासाठी लाउडस्पीकरचा वापर टाळण्यात आला.

तत्पूर्वी, बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईच्या जवळपास 26 मशिदींच्या धर्मगुरुंनी यापुढे सकाळची अजान भोंग्यावरुन दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतला होता. प्रकरणी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याचा निश्चय केला आहे.

बातम्या आणखी आहेत...