आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Allegations Of Corruption Against Army Project Is Shameful, I Have No Answer: CDS General Bipin Rawat

नवी दिल्ली:लष्कराच्या प्रकल्पांवर भ्रष्टाचाराचे आक्षेप लाजिरवाणे, माझ्याकडे उत्तर नाही : सीडीएस जनरल बिपिन रावत

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय दक्षता आयुक्तांनी (सीव्हीसी) लष्कराच्या प्रकल्पांवर घेतले होते आक्षेप

लष्करातील बांधकाम प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत केंद्रीय दक्षता आयुक्तांनी (सीव्हीसी) घेतलेल्या आक्षेपांबद्दल चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांना कडक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, जवानांसाठी बांधण्यात येत असलेल्या घरांच्या दुर्दशेबाबतचे आक्षेप अत्यंत लाजिरवाणे आहेत. कारण माझ्याकडे यावर कोणतेही उत्तर नाही. याप्रकरणी चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही रावत यांनी दिले. जनरल रावत यांच्या १७ सप्टेंबरच्या या पत्रात मॅरिड अकोमोडेशन प्रोजेक्ट्सच्या अनेक प्रकरणांचा उल्लेख आहे. सीव्हीसींनी मीरतच्या एका प्रकल्पाबाबत आक्षेप नोंदवले होते. मात्र, जनरल रावत यांनी देशभरातील मॅरिड अकोमोडेशन प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दिल्लीत सलारिया एन्क्लेव्हचा उल्लेख केला आहे. हा परिसर निवासाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.