आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये मादक पदार्थांच्या मुद्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. भाजप नेते मनजिंदर सिरसा यांनी या प्रकरणी मुख्यंमत्री भगवंत मान यांना धारेवर धरत त्यांच्या सरकारने पाकिस्तानला क्लिनचीट दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पाकची बाजू घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दबाव टाकत आहेत काय? असा प्रश्नही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मान यांच्या नेतृत्वातील पंजाब सरकारने चंदिगडच्या मुद्यावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात मान यांनी पंजाबमध्येच मादक पदार्थ तयार होत असल्याचा दावा केला होता. त्यावर सिरसा यांनी ही टीका केली आहे.
मान म्हणाले होते -दुसऱ्या राज्यांतही आंतरराष्ट्रीय सीमा
पंजाबमध्ये मादक पदार्थ सीमापार पाकमधून येतात असे मानले तर राजस्थान पंजाबहून अडीच पट मोठे आहे. जम्मू काश्मीरचाही अर्ध्याहून अधिक भाग पाकला लागून आहे. पण, तिथे कुणीही चिट्टा (मादक पदार्थ) सेवन करत नाही. हे पदार्थ येथेच तयार होतात. आरोपी येथेच आहेत. लवकरच त्यांचे बुरखे फाडू, असे ते म्हणाले होते.
सिरसा म्हणाले -अविश्वसनीय, संपूर्ण जगाला ठाऊक आहे
भाजप नेते सिरसा यांनी या प्रकरणी भगवंत मान यांच्यावर मादक पदार्थांच्या तस्करीसंबंधी पाकला क्लिनचीट दिल्याचा आरोप केला आहे. मान मादक पदार्थ येथेच तयार होत असल्याचा आरोप केला आहे. मादक पदार्थांची पाकिस्तानातून तस्करी होत असल्याचे सर्वश्रूत आहे, असे ते म्हणालेत.
ड्रोनद्वारे तस्करी, केंद्राने बीएसएफची कक्षा रुंदावली
गत काही दिवसांपासून पंजाबमध्ये मादक पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा तापला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या काळातही ड्रोनद्वारे या पदार्थांची तस्करी झाली. हे ड्रोन पाकिस्तानातू आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने बीएसएफची कक्षा 15 किमीने वाढवून 50 किमी केली. आता नवे मुख्यंमत्री भगवंत मान यांच्या विधानामुळे या मुद्यावरील राजकारण पुन्हा तापले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.