आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यांना कारवाईबाबत विचारणा:ख्रिश्चनांवर हल्ल्याचा आरोप, कोर्टाने अहवाल मागवला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने गुरुवारी ख्रिश्चन संस्थांवरील हल्ल्यावरून दाखल याचिकेवर सुनावणी केली. या दरम्यान न्यायालयाने गृहमंत्रालयाला निर्देश दिले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, आेडिशा, छत्तीसगड, झारखंडसह इतर राज्यांतून ख्रिश्चन संस्थांवरील हल्ल्याशी संबंधित अहवाल न्यायालयाने मागवला.

याचिकाकर्त्यांचे वकिल कॉलिन गोंसाल्विस यांनी आरोप केला. राज्यांत ख्रिश्चनांच्या ७०० प्रार्थना सभांना रोखण्यात आले आहे. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड म्हणाले, आरोपांच्या सत्यतेवर एकमत दिसत नाही. म्हणून त्याच्या पुष्टीसाठी राज्यांकडून अहवाल मागवला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...